आज शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार
नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक २३ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सीताबर्डी परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम असल्याने येथील वीज पुरवठा सुमारे पाच तास बंद राहणार आहे. ...
कु सानिका मंगर ला दौड मध्ये दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक
कन्हान : - ३२ वी विद्या भारती अखिल भारतीय मैदानी स्पर्धा नागौर राजस्थान येथे सुरू असुन मैदानी दौड स्पर्धेत कु सानिका मंगरने प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक पटकावित १७ वर्ष वयोगट मुलीं मध्ये उत्कृष्ट...
कामठी विधानसभा मतदार संघात मागील दोन तासात 7 टक्के मतदान
कामठी : आज 21 ऑक्टोबर ला कामठी विधानसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर एकूण 4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मागील दोन तासातील सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7 टक्के मतदान झाल्याची माहिती...
Maharashtra Assembly Polls: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
नागपूर मधील धरमपेठ येथे पत्नी अमृता फडणवीस आणि आई यांच्यासह माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे, सुशासन आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान जरूर करावे असे आवाहन त्यांनी यावेळी...
आचारसंहोतेचे उल्लंघन करणाऱ्या भाजप चे उमेदवार टेकचंद सावरकर विरुद्ध गुन्हा दाखल
कामठी :-येत्या 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58-कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असलेल्या 4 ऑक्टोबर पासून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तेव्हा निवडणुकीदरम्यान...
सख्ख्या भावानेच केला मोठ्या भावाचा खून
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे दोन सखख्या भावात मागील कित्येक महिन्यापासून सुरू असलेला वाद हा विकोपाला गेल्याने माझ्या शौचालय चा वापर तू का केला?या कारणावरून आज झालेल्या वादातून लहान भावाने...
शेवटच्या दिवशी पालकमंत्र्यांनी साधला थेट मतदारांशी संपर्क
भाजपा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे केले आवाहन नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील अनेक वस्त्यांमध्ये धडाक्यात प्रचार केला. मतदारांशी घरोघरी संपर्क करून भाजपा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत...
‘मुंबईकर’ झालेल्या फडणवीसांना नागपूरकरांनी मतदान करू नये..! – डॉ. आशिष देशमुख
पाच वर्षांपूर्वीच नागपूरचे घर कुलूपबंद करून मुंबईला नेहमीसाठी स्थायिक झालेल्या भाजपच्या श्री. देवेंद्र फडणवीसांचे सामान्य जनतेशी असलेले आपुलकीचे नाते आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता दक्षिण-पश्चिम नागपूरच्या मतदारांनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन डॉ. आशिष देशमुख यांनी जनतेला केले...
मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत ‘कत्ल की रात : अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.
मतपेटीत मत टाकतानाही बदलू शकतात निर्णय, सोशल मिडिया वापरकर्ते उमेदवारांकडून 'टार्गेट'
नागपूर: प्रचारतोफा थंडावल्यानंतरही सोशल मिडियावर मात्र मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत 'कत्ल की रात'सारखेच चित्र राहणार असल्याचे चित्र आहे. फेसबुक, व्हॉट्स अप या प्रचलित सोशल मिडिया ग्रुपवर उमेदवारांकडून एखादी अफवा पसरवून किंवा...धंतोली रेल्वे पूल ते बैधनाथ चौक वाहतूक बंद
मनपा आयुक्तांचे आदेश : सीमेंट रस्ता बांधकामामुळे डाव्या बाजुने दुतर्फा वाहतूक नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे शासकीय अनुदानांतर्गत धंतोली रेल्वे अंडर ब्रिज ते बैधनाथ चौकापर्यंत उजव्या बाजूने डांबरीकरण करण्याचे प्रस्तावित असून सदर कामाकरीता या मार्गावरील उजवीकडील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश...
अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखी इसमाचा मृत्यू
कामठी:-स्थानिक रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाब नगर निर्मनुष्य रेल्वेफाटक जवळील रेल्वेमार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखो इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून...
प्रा हिना कौसर सेट परीक्षा उत्तीर्ण
कामठी :-प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली युजीसीद्वारा आयोजित राज्य पात्रता परीक्षा (सेट) प्रा हिना कौसर यांनी प्रथम फेरीतच उत्तीर्ण केली.प्रा हिना कौसर या येथील एस के पोरवाल महाविद्यालयात इंग्रजी या विषयाच्या प्राध्यापिका असून अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ही सेट परीक्षा उत्तीर्ण...
नोंदणीकृत खासगी रुग्णालय, दवाखान्यांनी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक
आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : माहिती न देणा-या डॉक्टरांवर होणार कारवाई नागपूर: डेंग्यूबाबत मनपातर्फे करण्यात येणा-या उपाययोजनांसह जनजागृती महत्वाची आहे. याशिवाय शहरातील मनपा रुग्णालये, शासकीय रुग्णालयांमधील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला दिली जाते. मात्र काही खासगी रुग्णालय,...
सायली चिलड्रेन हॉस्पिटल ला लागली आग, सुदैवाने जीवितहानी टळली
कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लहान मुलांचे हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध पावलेले सायली चिलड्रेन हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या कडेच्या सुरक्षा भिंतीच्या एसीला अचानक आग लागल्याची घटना सकाळी 10 दरम्यान घडली . घटना घडताच जुनी...
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीवर नागरिकांची पुष्पवृष्टी
प्रचंड उत्साहात 10 हजारावर नागरिक झाले सहभागी नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-रिपाई-बरिएमं महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीने गोपालनगर व परिसर आणि दुमदुमून गेेला. प्रचंड उत्साहात दहा हजारावर नागरिक, महिला व युवक या रॅलीत आज सकाळी सहभागी झाले...
ठोकशाही करू नका, घरात घुसून मारण्याची आमचीही ताकद आहे : मुख्यमंत्री
पाटणसावंगीतील जाहीरसभा शेवटच्या दिवशी गाजली सुमारे 10 हजारावर नागरिकांची उपस्थिती नागपूर: पाटणसावंगीत जाहीरसभेला मी येऊ नये असे प्रयत्न झाले. पण आपल्याला फक्त प्रेमाने थांबविता येऊ शकते, धमक्यांनी नव्हे. धमक्यांचे दिवस आता गेले. ठोकशाही करू नका अन्यथा घरात घुसून मारण्याची आमचीही ताकद...
नागपूर महानगरपालिकेद्वारे चार नविन बस शेल्टरचे निर्माण
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत आकाशवाणी चौक ते विधानभवन या मार्गावर अतिरिक्त चार नवीन बस शेल्टर तयार करण्यात आले आहेत. या नवीन बस शेल्टरवरून आता प्रवाशांना बसमध्ये चढ उतार करताना सुविधा होणार आहे. आकाशवाणी चौक ते विधान भवन या...
शहरात ओडीएफ प्लस प्लस मानांकनासाठी दर्जेदार सुविधा द्या – आयुक्त
स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामासंदर्भात कर्मचाऱ्यांची कार्यशाळा शहराला ओडीएफ ++ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार नागपूर: शहराला ओडीएफ प्लस मानाकंन प्राप्त झाले आहे. आता शहराला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळविण्यासाठी मनपा प्रयत्न करत आहे. ओडीएफ प्लस प्लस मानाकंनासाठी शहरातील सर्व सार्वजनिक व...
मेट्रो कामठीपर्यंत येणारच : नितीन गडकरी
कामठीत भरपावसात जाहीरसभेला हजारोंची हजेरी नागपूर: भाजपा-शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात कामठी शहर आणि तालुक्यात 50 वर्षात झाले नसतील एवढी कामे झाली आहेत. ही सर्व कामे पालकमंत्री बावनकुळे यांनी केली आहेत. आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्यात मेट्रो कामठीपर्यंत म्हणजे ड्रॅगन पॅलेसपर्यंत येणारच...
पाच वर्षात काँग्रेसच्या 15 वर्षापेक्षा दुप्पट कामे भाजपाने केली : मुख्यमंत्री
देशात सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही केली कन्हान येथे हजारोंच्या उपस्थितीत जाहीरसभा नागपूर: महाराष्ट्रात काँग्रेसच्या15 वर्षापेक्षा दुप्पट कामे आम्ही पाच वर्षात केली असून काँग्रेसने त्यांच्या कामाचा लेखाजोखा द्यावा आम्ही आमच्या कामाचा हिशेब देतो, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीला...
गोसीखुर्द बुडित क्षेत्राचा आराखडा पुन्हा तयार केला : पालकमंत्री बावनकुळे
कुही, राजोला, वेलतूर येथे जाहीरसभा नागपूर: गोसीखुर्द प्रकल्पात गेलेल्या बुडित क्षेत्राचा आराखडा काँग्रेसच्या काळात योग्यरीत्या न बनल्यामुळे भाजपाच्या सरकारने पुन्हा बुडित क्षेत्राचा आराखडा तयार केला असून गोसीखुर्दमधील जे प्रकल्पग्रस्त पुनवर्सन व मदतीपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यावर आता अन्याय होणार नाही, अशी...