Published On : Tue, Oct 22nd, 2019

आज शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या दिनांक २३ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर, धरमपेठ, बर्डी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सीताबर्डी परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम असल्याने येथील वीज पुरवठा सुमारे पाच तास बंद राहणार आहे.

सकाळी ८ ते ११ या वेळेत शिवाजी नगर,हिल रोड, धरमपेठ, भगवाघर, शास्त्री ले आऊट, खामला, अग्ने ले आऊट, सिंधी कॉलनी, टेलिकॉम नगर, प्रताप नगर,सावरकर नगर, व्यंकटेश नगर, भेंडे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, राऊत वाडी, मनीष ले आऊट, पन्नासे ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, शेगाव नगर, शिर्डी नगर, पेंढारकर नगर, जयहिंद नगर, नरसाळा, सकाळी ९ ते ११ या वेळेत जयप्रकाश नगर, राजीव नगर, राहुल नगर, गांगुली ले आऊट, माटे चौक, शेवाळकर गार्डन,व्हीआरसीइ टेलेफोन एक्सचेंज येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८. ३० ते ११ या वेळेत सुभाष नगर, तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, हिंगणा रोड, अध्यापक ले आऊटयेथील वीज पुरवठा बंद राहील. सीताबर्डी परिसरात भूमिगत वीज वाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने पहाटे ६ ते सकाळी ११ या वेळेत बर्डी, महाजन मार्केट, शनी मंदिर, आनंद टॉकीज, टेकडी गणेश मंदिर. मूर मेमोरियल हॉस्पिटल, शासकीय विज्ञान संस्था, शासकीय मुद्रणालय, सिटीओ कार्यालय, मॉरिस कॉलेज टी पॉईंट येथील वीज पुरवठा बंद राहील.