Published On : Sat, Oct 19th, 2019

प्रा हिना कौसर सेट परीक्षा उत्तीर्ण

कामठी :-प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली युजीसीद्वारा आयोजित राज्य पात्रता परीक्षा (सेट) प्रा हिना कौसर यांनी प्रथम फेरीतच उत्तीर्ण केली.प्रा हिना कौसर या येथील एस के पोरवाल महाविद्यालयात इंग्रजी या विषयाच्या प्राध्यापिका असून अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ही सेट परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी महाविद्यालयाचे नाव उंचाविले.

त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र बागडे उपप्रचार्या सरिता अग्रवाल, पर्यवेक्षिका सुनीता भौमिक,प्रा डॉ सुधीर अग्रवाल, प्रा विनोद भट, प्रा वंजारी,प्रा योगेश मार्चटवार, प्रा किरण पुडके, प्रा वैशाली म्हस्के,प्रा किरण पेठे,प्रा वासनिक मॅम, प्रा जोशी मॅम, प्रा वृंदा पराते, प्रा नागपुरे, प्रा आशिष क्षीरसागर,प्रा पंकज वाटकर आदी प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

संदीप कांबळे कामठी