Published On : Sat, Oct 19th, 2019

सायली चिलड्रेन हॉस्पिटल ला लागली आग, सुदैवाने जीवितहानी टळली

कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लहान मुलांचे हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध पावलेले सायली चिलड्रेन हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या कडेच्या सुरक्षा भिंतीच्या एसीला अचानक आग लागल्याची घटना सकाळी 10 दरम्यान घडली .

घटना घडताच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे दुययं म पोलीस निरीक्षक परदेसी यांच्या सह पोलीस पथकाने तसेच नजीकच्या नागरिकांनी त्वरित मदतीची धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Advertisement

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत नगर परिषद च्या अग्निशमन वाहनाच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्यात यश गाठले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या आगीत एसी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement