शेवटच्या दिवशी पालकमंत्र्यांनी साधला थेट मतदारांशी संपर्क

भाजपा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे केले आवाहन

नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील अनेक वस्त्यांमध्ये धडाक्यात प्रचार केला. मतदारांशी घरोघरी संपर्क करून भाजपा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले.

खरबी येथे सुमारे 12 वस्त्यांमध्ये बावनकुळे यांनी घरोघरी संपर्क साधला. यावेळी त्यांच्यासोबत अजय बोढारे, शुभांगी गायधने, गीता पराते, लता रहांगडाले, गणेश बावनकुळे, बंडूजी वैद्य, नितीन शेळके, ज्ञानेश्वर कुंभरे, प्रवीण कडव, यशवंत खंडाईत आदी उपस्थित होते.

बहादुरा भागात गजानननगर, मोहीतनगर, कोरची नगर, शेगावनगर या भागात त्यांनी प्रचार केला. गोन्हीसिम येथे टेक ऑफ सिटी, जयहिंदनगर, श्रीरामनगर, विनोबानगर या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत बालू नगराळे, दिवाकर सेलोकर, सतीश यादव, राधिकाताई ढोमणे आदी उपस्थित होते.

नरसाळा भागात नीलकमलनगर, संत ज्ञानेश्वरनगर, प्रभात नगर, अंबिका नगर, राधारमण कॉलनी, नरसाळा नवीन वस्ती, नरसाळा गाव, गोविंदनगर, संभाजीनगर, स्वागतनगर, इंद्रनगर, सुदर्शन नगर, भारतमाता नगर हा भाग पालकमंत्र्यांनी पिंजून काढला. याप्रसंगी त्यांच्यासोबत आरती गीते, सुखदेव माळवे, रवींद्र इंगोले, पिंटू बाळस्कर व वस्तीतील अन्य लोक उपस्थित होते.

हुडकेश्वरमधील ताजेश्वरनगर, स्वागतनगर, शारदानगर, नीळकंठनगर, रेणुकामाता नगर, गोविंद नगर, श्री कॉलनी, दुबेनगर, कडूनगर, चंद्रकिरणनगर, सावरबांधे लेआऊट, पवारनगर, चंद्रभागानगर, रोटकर लेआऊट, साईनगर नं. 3, सूर्योदयनगर, शिवांगीनगर, आम्रपालीनगर या भागातील मतदारांशी थेट संपर्क करून त्यांना भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या प्रचारात राहुल पत्थे, संगीता इंगोले, नितीन वैद्य, पुष्पाताई धांडे, सीमा साठवणे, दामोदार बुरघाटे, शर्मिलाताई बिडकर, तुळशीराम पिंपळापुरे, गुलाबराव चिचाटे, मोरेश्वर राऊत आदी सहभागी झाले होते.