Published On : Sun, Oct 20th, 2019

आचारसंहोतेचे उल्लंघन करणाऱ्या भाजप चे उमेदवार टेकचंद सावरकर विरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement

कामठी :-येत्या 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या 58-कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असलेल्या 4 ऑक्टोबर पासून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तेव्हा निवडणुकीदरम्यान 21 सप्टेंबर असून लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन न होता निवडणूक पारदर्शक पद्ध्तीने व लोकशाहीच्या उत्सवा सारखा पार पडावे यासाठी निवडणूक विभागातर्फे 4 भरारी पथक नेमण्यात आले ज्यामध्ये कामठी विधानसभा मतदार संघातील नागपूर ग्रामीण मध्ये 1, मौदा तालुक्यात 2 व कामठी तालुक्यात 2 भरारी पथक नेमण्यात आले.

यानुसार कामठीतील नेमलेले भरारी पथक प्रमुख संजय कांबळे हे पथकासह जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टाल येथे वाहन क्र एम एच 31 ए जी 9830 ने गस्त घालत असता प्रचार वाहन क्र एम एच 40 बी जी 7822 चा चालक भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार टेकचंद सावरकर असे बॅनर लावलेले व ध्वनिक्षेपनावर मोठ्या आवाजात गाणी वाजवून प्रचार करीत असता मिळून आल्याने त्याची सविस्तर विचारपूस करीत प्रचार परवानगी विचारले असता व्हाट्सएप वर असल्याचे सांगितले दरम्यान वाहन मालकाला लेखी परवानगी असल्याचे विचारणी केले असता परवानगी नसल्याचे सांगितले यावरून विना परवानगीने भाजप चे उमेदवार टेकचंद श्रावण सावरकर यांचा प्रचार सुरु असल्याचे निष्पन्न होऊन लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन केल्याने विना परवानगी प्रचार करीत असलेला सदर वाहन चालक आसिफ अब्दुल हनिफ शेख वय 19 वर्षे रा चंद्रमनी नगर आजनी नागपूर,वाहनमालक सतीश सीताराम कवड वय 23 वर्षे रा खापा तसेच उमेदवार नामे टेकचंद श्रावण सावरकर यांचे विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम 272, 177 सहकलम 33 (एन)131महाराष्ट्र पोलीस कायद्यांनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला.असून प्रचार वाहन पोलिसानी ताब्यात घेतले आहे.ही यशस्वी कारवाही दुपारी अडीच दरम्यान करण्यात आली.

ही यशसवी कारवाही निवडणूक निर्णय अधिकारी श्याम मंदनुरकर, सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे, तहसीलदार प्रशांत सांगडे, यांच्या माँर्गदर्शनार्थ फ्लायिंग स्कॉड टीम 3 चे पथक प्रमुख संजय कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पुरभे, एएसआय भानुसे, लोणारे, वाहनचालक कोरे व फोटोग्राफर लोकेश दीघडे यांनी केली .

संदीप कांबळे कामठी