भाजपच्या संघटनात्मक बांधणीला वेग; विधानसभा व मंडळाच्या प्रभागनिहाय संयोजकांच्या नियुक्त्या जाहीर
नागपूर: आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत.भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांर्गत येणाऱ्या मंडळांसाठी 'प्रभाग संयोजकां' च्या नावांची घोषणा केली आहे. संघटनात्मक मजबुतीसाठी करण्यात आलेल्या या नियुक्त्या...
प्रा संजय भेंडे यांच्यावर मनपा निवडणूक प्रमुखपदाची मोठी जबाबदारी
नागपूर: आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अधिकृत पत्रक काढून भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांची नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 'निवडणूक प्रमुख' म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.प्रा...
कडबी चौकजवळील ‘बबल्स किड्स प्ले झोन’ला भीषण आग; सुमारे १.५ लाखांचे नुकसान
नागपूर : कडबी चौक परिसरातील ‘बबल्स किड्स प्ले झोन’ला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून, आगीत खेळण्यांचे साहित्य आणि इतर उपकरणे जळून खाक झाली आहेत. या आगीत सुमारे १.५ लाख...
नागपूर मनपा निवडणूक :राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आभा पांडे यांचा प्रभाग 21 मधून अर्ज
नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा आभा पांडे यांनी प्रभाग क्रमांक...
उद्धव ठाकरे पाच वर्षे घराबाहेरच दिसले नाहीत, त्यांनी मुस्लिम…; भाजप जिल्हाध्यक्षांचा थेट हल्ला
मुंबई - खासदार संजय जाधव यांनी केलेल्या “राष्ट्रवादीला दिलेलं मत म्हणजे भाजपलाच दिलेलं मत” या वक्तव्यावर भाजप जिल्हाध्यक्ष सुरज भुमरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी भुमरे यांनी विरोधकांसह उद्धव ठाकरे यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. सुरज भुमरे म्हणाले की,...
नागपुरातील संगीत कार्यक्रमात रेखा, अमिताभ, धर्मेंद्रवरील अजरामर गाण्यांना रसिकांनी दिली दाद
नागपूर : श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी यांच्या वतीने ‘आयकॉन्स ऑफ बॉलिवूड’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी सायंटिफिक हॉल येथे करण्यात आला होता. या कार्यक्रमात रेखा, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र व हेमा मालिनी या दिग्गज कलाकारांवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची दाद...
महायुतीचा फॉर्म्युला ठरला; नागपुरात राष्ट्रवादीला साइडलाइन, भाजप–शिवसेनेची थेट आघाडी
नागपूर : विदर्भातील महानगरपालिका निवडणुकांआधी महायुतीने अखेर आपला राजकीय डाव उघड केला आहे. नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या चार महत्त्वाच्या शहरांत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम वागणूक...
नागपूर–नवी मुंबई थेट विमानसेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद
नागपूर : नवी मुंबई येथे नव्याने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारी नागपूर–नवी मुंबई ही पहिली थेट विमानसेवा प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या या पहिल्या उड्डाणाला ६० टक्क्यांपेक्षा जास्त आसनसंख्या भरल्याने नागपूरकरांनी या सेवेला दिलेला प्रतिसाद स्पष्ट झाला...
नागपुरात ख्रिसमस पार्टीचा शेवट हिंसेत; प्राईड स्क्वेअर परिसरात तरुणाची हत्या, एक जण गंभीर
नागपूर : नाताळ सणाच्या आनंदावर दुर्दैवी सावली पडली आहे. वर्धा रोडवरील प्राईड स्क्वेअरजवळ शुक्रवारी पहाटे घडलेल्या हिंसक घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून, आणखी एक तरुण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे चारच्या...
नागपूर मनपा निवडणूक: १५१ जागांसाठी भाजपकडे १,६५२ इच्छुक
नागपूर : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या (एनएमसी) निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंगळवारपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाल्याने भाजपने प्रचारयंत्रणा सक्रिय केली असून, यंदा पक्षासमोरील सर्वात मोठे आव्हान बाह्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अंतर्गत बंडखोरीचे असल्याचे चित्र आहे. याच...
मुंबईत काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डची बैठक; उमेदवारांवर होणार मंथन, वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई- काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डची महत्त्वाची बैठक होणार असून, राज्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. एकूण २९ नगरपालिकांच्या निवडणुका असल्याने कोणत्या ठिकाणी आघाडीसोबत निवडणूक लढवायची, यावरही बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय...
नगरपरिषद निवडणुकीवर शिंदेसेनेचे प्रश्नचिन्ह; उपजिल्हाप्रमुख वर्धराज पिल्लेंकडून ‘सिस्टम सेट’चा आरोप
नागपूर - नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवानंतर आता शिंदेसेनेचे नागपूर जिल्हा उपप्रमुख वर्धराज पिल्ले यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना पिल्लेंनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेलाच कटघऱ्यात उभं करत, हे निकाल नैसर्गिक नसून ‘सिस्टम सेट’चा परिणाम असल्याचा...
उद्धव ठाकरेंना धक्का; ४३ वर्षांची शिवसेनेची निष्ठा संपुष्टात, नाशिकचे माजी महापौर भाजपच्या वाटेवर
नाशिक - राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. युती–आघाड्यांच्या चर्चांबरोबरच पक्षांतराची लाटही जोर धरू लागली आहे. सत्ताधारी महायुतीकडे नेते आणि कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असतानाच, उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. नाशिकचे माजी महापौर...
कळमना रेल्वे क्रॉसिंगजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार महिलेचा मृत्यू
नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी, २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलवरून जाणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सपना महेश मार्कंडे (रा. मिनी माता नगर, पाचझोपडा परिसर, जैन धर्मार्थ रुग्णालयाजवळ,...
मुंबईत विकासाच्या नावावरच निवडणूक होणार;शिवसेना–मनसे युतीवर बावनकुळेंचा हल्लाबोल
नागपूर :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीवर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. दोन्ही पक्षांनी आपली राजकीय ताकद गमावल्यामुळेच अशी युती करण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला. बावनकुळे म्हणाले,उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सध्याची...
मनसे -शिवसेना ; एकत्र, राज– उद्धव ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत असलेला क्षण अखेर साकार झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली. मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि...
नागपुरातील गुमगावात मालमत्ता वादातून गोळीबार, दोन जखमी
नागपूर: हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव गावात मालमत्ता वादातून बुधवारी, २४ डिसेंबर रोजी गोळीबाराची घटना घडली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. आरोपींचे नाव नाना जगनाथ देवतळे असे आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ चाललेल्या मालमत्ता वादातून नाना जगनाथ देवतळे यांनी...
नागपूर मनपा निवडणूक:जागा वाटपाचा गोंधळ, महायुती-महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर !
नागपूर- महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या रणभूमीवर मोठ्या राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर वाद उफाळल्यामुळे राजकीय वातावरण तणावग्रस्त झाले आहे. भाजपाचा...
नागपूर मनपा निवडणूक: तिकीटासाठी थेट दिल्ली-मुंबईपर्यंत धाव; आमदारांच्या दारात इच्छुकांची गर्दी
नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची घोषणा होण्याआधीच शहरातील राजकारण तापू लागले आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, इच्छुकांनी तिकीटासाठी सर्व मार्ग खुले केल्याचे चित्र दिसत आहे. फक्त पक्षाच्या अधिकृत मुलाखती...
राज्यात पुढील काही तास थंडीचा कडाका; गारठा वाढणार, हवामान विभागाचा इशारा
नागपूर - राज्यातील हवामानात अचानक बदल जाणवत असून अनेक भागांत थंडीची तीव्र लाट पसरताना दिसत आहे. पुढील काही तास राज्यासाठी अधिक थंड ठरण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा...
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन; त्यानंतर ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार
मुंबई- अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीचा अखेर मुहूर्त ठरला आहे. उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. याबाबतची माहिती...





