Published On : Mon, Oct 21st, 2019

कामठी विधानसभा मतदार संघात मागील दोन तासात 7 टक्के मतदान

Advertisement

कामठी :  आज 21 ऑक्टोबर ला कामठी विधानसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर एकूण  4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा  हक्क  बजावणार असून मागील दोन तासातील सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाययक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संघ मानल्या जाणाऱ्या कामठी विधानसभा मतदार संघातील 494 मतदान केंद्रावर 4 लक्ष 39 हजार 875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत ज्यामध्ये 2 लक्ष 25 हजार 691 पुरुष मतदार तर 2 लक्ष 14 हजार 181 स्त्री मतदार आहेत  तसेच तीन तृतीयपंथी मतदार चा समावेश आहे.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निवडणूक प्रशासन च्या वतीने मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कामठी विधानसभा मतदार संघाअंतर्गत 494 मतदान केंद्र आरक्षित करण्यात आले असून यामध्ये कामठी शहरात 245 मतदान केंद्र, मौद्यात 105, नागपूर ग्रामीण मध्ये 130 मतदान केंद्र असे एकूण 480 मतदान केंद्र आहेत तसेच 14 सहाययक मतदान केंद्र आहेत ज्यामध्ये कामठी 3, मौदा 1 व नागपूर ग्रामीण च्या 10  मतदान केंद्राचा समावेश आहे.

याशिवाय 593  बॅलेट युनिट, 643 कंट्रोल  युनिट व 27 वि हिपॅट आहेत .मतदान प्रक्रियेसाठी  मतदान केंद्रावर 543 केंद्राध्यक्ष सह प्रत्येकी 3 मतदान केंद्र अधिकारी ची नियुक्ती करण्यात आली आहे.या प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे तर 48 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात आले आहे यामुळे या मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण होणार आहे.दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर ची व्यवस्था  करण्यात आली आहे तसेच या मतदार संघात नागपूर ग्रामीण चे सेंट पॉल हे मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र तर 132  सखी मतदान केंद्र आहेत.

   कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत त्यात 7 पक्षीय तर 5 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे या  कामठी विधानसभा मतदार संघात कामठी तालुका, मौदा तालुका तसेच नागपूर ग्रामीण चा समावेश आहे यामध्ये  एकूण 4 लक्ष 39 हजार 875 मतदारांचा समावेश असून कामठी तालुक्यात 2 लक्ष 27 हजार 333 मतदारांचा समावेश आहे ज्यामध्ये 1 लक्ष 16 हजार 584 पुरुष मतदार, तर 1 लक्ष 10 हजार 746 स्त्री मतदारांचा समावेश आहे, मौदा तालुक्यात 79 हजार 944 मतदार आहेत ज्यामध्ये 40 हजार 570 पुरुष तर 39 हजार 374 स्त्री मतदारांचा समावेश आहे तसेच नागपूर ग्रामीण मध्ये 1 लक्ष 32 हजार 598 मतदारांचा समावेश आहे ज्यामध्ये 68 हजार 537 पुरुष तर 64 हजार 61 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

  संदीप कांबळे कामठी

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement