Published On : Sun, Oct 20th, 2019

सख्ख्या भावानेच केला मोठ्या भावाचा खून

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे दोन सखख्या भावात मागील कित्येक महिन्यापासून सुरू असलेला वाद हा विकोपाला गेल्याने माझ्या शौचालय चा वापर तू का केला?या कारणावरून आज झालेल्या वादातून लहान भावाने स्वतःच्या मोठ्या भावाला धारदार तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान रमानगर येथे घडली असून खून झालेल्या मृतकाचे नाव खुशाल ताराचंद बोरकर वय 50 वर्षे तर खून केलेल्या आरोपी लहान भावाचे नाव सुरेश ताराचंद बोरकर वय 45 वर्षे दोन्ही राहणार रमानगर कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार हे दोन्ही भाऊ विवाहित असून रमानगर येथील चार स्वतंत्र खोलीच्या एका मोठ्या घरात पूर्वीपासून वास्तव्यास आहेत त्यातील दोन खोलीच्या घरात किरायदार राहतात तर हे दोन भाऊ दोन वेगवेगळ्या खोलीत वास्तव्यास आहेत तसेच यांचे स्वतंत्र शौचालय सुद्धा आहेत मात्र या दोन भावाची विचारसारणीत सामंजस्य नसल्यामुळे दोघांचे एकमेकाशी पटत नव्हते त्यातच आज माझ्या शौचालय मध्ये तू का गेला?यावरून या दोन भावात झालेले शाब्दिक भांडण हे विकोपाला गेले आणि संतापून रागाच्या भारात लहान भावाने त्या मोठ्या भावाच्या छातीवर एका तीक्ष्ण अवजाराने सपासप वार करून घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले .घटनेची माहिती हवेसारखी पसरताच बघ्यांनि एकच गर्दी केली होती काही वेळेतच परिसरातील शेजारील नागरिकांनी मदतीची धाव घेत नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले मात्र तोवर त्याने जीवनाचा अखेर नोरोप घेतला होता.यावेळी डॉ वाघमारे यांनी मृतक इसमाला तपासून मृत घोषित केले.

मृतक खुशाल बोरकर यांच्या कुटुंबात पत्नी तसेच एकुलता एक 12 वर्षीय राजा नामक मतिमंद मुलगा आहे.मृतकाला शास्कोय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता त्याचा जीव वाचावा यासाठी मृतकाच्या पत्नी व मतिमंद मुलाने देवाला विनंती करीत साकडे घातले मात्र तोवर वेळ निघून गेल्याने देवही मदतीला धावू शकला नाही मात्र या दोघांची देबाला विनंती करणारे दृश्य बघून सर्वांचे डोळे पाणावले होते.


घटनेची माहिती मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळचा पंचनामा करीत मृतदेहाच्या पार्थिवावर शास्कोय उपजोल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करन्यात आले यासंदर्भत फिर्यादी मृतकाची पत्नी सीमा बोरकर ने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुरेश बोरकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे .बातमो लोहिस्तोवर आरोपीस अटक करण्यात आले नव्हते.

बॉक्स:-मृतकाला एकुलता एक मुलगा असलेला 12 वर्षोय राजा ला इतका वडीलप्रेम द्यायचा को त्याची कुठलीही इच्छा पूर्ण करण्यास तत्पर राहून मित्रासारखा राहायचा मात्र काळाने घेतलेल्या झडपीत या मतिमंद मुलाचा वडिलाचा आधार गेल्याने या मतिमंद मुलाकडे आता कोण लक्ष पुरविणार ? आई त्याचे पोषण कसे करणार अशा विविध चर्चेला उत येत परिसरात भावणूक दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संदीप कांबळे कामठी