Published On : Sat, Oct 19th, 2019

नागपूर महानगरपालिकेद्वारे चार नविन बस शेल्टरचे निर्माण

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत आकाशवाणी चौक ते विधानभवन या मार्गावर अतिरिक्त चार नवीन बस शेल्टर तयार करण्यात आले आहेत. या नवीन बस शेल्टरवरून आता प्रवाशांना बसमध्ये चढ उतार करताना सुविधा होणार आहे.

आकाशवाणी चौक ते विधान भवन या भागात शासकीय कार्यालये असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावार आपली बसचा उपयोग करत असतात. या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने असल्याने वाहतूकीची कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी परिवहन विभागाने चार अतिरिक्त बस शेल्टर विविध मार्गांसाठी नियोजित केले आहेत. पूर्वी या मार्गावर दोन बस शेल्टर असल्याने नागरिकांना बसमध्ये चढताना व उतरताना त्रास व्हायचा. आता नवीन सहा बस शेल्टर तयार झाले आहेत. डीएएपीटी बस शेल्टर, आकाशवाणी चौक बस शेल्टर, आयसीआय़सीआय बॅंक समोर बस शेल्टर, नारंग टॉवर, विधानभवन बस शेल्टर, इलाहाबाद बस शेल्टर असे नवीन सहा बस शेल्टर आहेत.

Advertisement

1. डी.ए.ए.पी.टी.बस शेल्टरवरून सुटणाऱ्या बसेस

गोधणी (25), सावरमेंढा मार्ग गुमथळा (181), ब्राह्मणी फाटा (54), गोरेवाडा (79), निर्मलनगर (0्3), माहूरझरी (272)

2. आकाशवाणी चौक बस शेल्टरवरून सुटणाऱ्या बसेस

नारा (48), ओमनगर (158), नागरेनभवन (24), यशोधरानगर (23), वांजरी ले आऊट (188), जरीफटका(205)

3. आय.सी.आय.सी.आय बॅंक समोरील बस शेल्टरवरून सुटणाऱ्या बसेस

जे.एन.हॉस्पीटल मार्ग कामठी कन्हान (38), कामठी मार्गे इंदोरा (20), ड्रॅगन पॅलेस (111), रनाळा (163), समता नगर (172), नारी (49), उप्पलवाडी (157), कामठी (245), सिद्धार्थ स्कुल (259)

4. नारंग टॉवर बस शेल्टर

पारडी मार्ग गांधीबाग(28), पवनगाव मार्गे भरतवाडा (76), बिडगाव तरोडी, चिखली(171), संघर्ष नगर (185), कामठी मार्गे शांतीनगर (167), गुमथळा मार्गे पारडी (244)

5. विधानभवनासमोरील बस शेल्टर

बहादुर फाटा (106), सुदामनगरी (228), नरसाळा (52), गिड्डोबा नगर (162), बहादूरगाव (106A), रमनामारोती (164), श्रीकृष्ण नगर (160), जिजामाता नगर (251), सुमित नगर (270)

6.इलाहाबाद बॅंकेसमोरील बस शेल्टर

पिपाळाफाटा (4/7), बनवाडी(67), वडद(68), पिपळागाव मार्गे बेसा फाटा(206), शेष नगर (85), चक्रपाणी नगर (186), वेळहरी मार्गे बेसा घोगली (210), खरसोली मार्गे पिपळाफाटा(233), अयोध्या नगर साई मंदिर (234), बेसा (79), न्यू नरसाळा (19), पिपळाफाटा मार्गे कैलाशनगर (176), बेसा (256), पिपळाफाटा मार्गे उदय नगर(258)

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement