Published On : Tue, Oct 22nd, 2019

कु सानिका मंगर ला दौड मध्ये दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक

Advertisement

कन्हान : – ३२ वी विद्या भारती अखिल भारतीय मैदानी स्पर्धा नागौर राजस्थान येथे सुरू असुन मैदानी दौड स्पर्धेत कु सानिका मंगरने प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक पटकावित १७ वर्ष वयोगट मुलीं मध्ये उत्कृष्ट खेळुन घवघवीत यश संपादन केले.

नागौर राजस्थान येथे सुरु असलेल्या विद्या भारती अखिल भारतीय ३२ वी मैदानी स्पर्धेत संपुर्ण भारतातुन ११ श्रेत्रा चे ७५० च्या अधिक खेडाळु सहभागी झाले आहे. या स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी भारताचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री आणि प्यारा ओलंपिक प्लेअर देवेंद्र झांजरिया प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान ची खेडाळु कु. सानिका अनिल मंगर हीने पश्चिम श्रेत्राचे प्रतिनिधीत्व करित १७ वर्ष वयोगट मुलीं मध्ये १००, २०० मी. दौड (धावनी) स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण पदक पटकाविले. तर रौप्य पदक बिहार आणि कास्य पदक तमिळनाडु राज्यातील मुलींनी प्राप्त केले. तसेच सानिका मंगर ने लांब उडीत रौप्यपदक प्राप्त केला.

कु सानिका मंगर ही बी के सी पी शाळेची इयत्ता १० वी ची विद्यार्थी असुन क्रिडा शिक्षक अमित ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सराव करित आहे. पंजाब येथे हो़णा-या एस जी एफ आय राष्ट्रीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली असुन खेडाळु कु. सानिका मंगर ही विद्या भारतीचे प्रतिनिधीत्व करणार असल्याने नागपुर जिल्हा, तालुक्याचे व शाळेचे नाव लौकिक करित असल्याबद्दल संस्थे चे अध्यक्ष राजीव खंडेलवाल, सचिव गेरोला मॅडम, मुख्याध्यापीका कविता नाथ, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर, पं. बच्छाराज व्यास विद्यालयचे शिक्षक जितेंद्र घोरडेकर, महाराष्ट्र विद्यालयचे शिक्षक धैर्यशील सुटे, सानिकाची आई कुंदा मंगर व वडिल अनिल मंगर आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.