नागपुरातील शाळेत दुर्दैवी घटना; व्हरांड्यात कोसळलेल्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू!
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकुमार केवलरामानी शाळेत बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मध्यंतराच्या वेळी तिसरीत शिकणारा आठ वर्षीय विद्यार्थी अचानक शाळेच्या व्हरांड्यात कोसळला. शाळा प्रशासनाने तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले....
नागपूर क्राइम ब्रँचची मोठी कारवाई; २ किलोहून अधिक गांजा जप्त,एका आरोपीला अटक
नागपूर: शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत क्राइम ब्रँच युनिट-२ने मोठी कारवाई केली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तकिया परिसरात छापा टाकून पोलिसांनी २ किलोहून अधिक गांजा जप्त केला असून, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एका...
नागपुरात अँटी नार्कोटिक्सची कारवाई; ९ ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोघांना अटक
नागपूर : शहरातील अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत नागपूर गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने मोठी कारवाई करत ९ ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून ड्रग्ससह मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...
दिल्लीत मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या गणवेशावर नेमप्लेटच नव्हती; नागपूरच्या तरुणाचा गंभीर आरोप
नागपूर: दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी नागपूरच्या एका तरुणाने गंभीर आरोप केले आहेत. शुभम मुन या तरुणाने, मारहाण करणाऱ्या काही पोलिसांच्या गणवेशावर नेमप्लेट नसल्याचा दावा केला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आरोपांची चर्चा रंगली...
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात आज महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन,जाणून घ्या कुठे काय परिणाम होणार?
मुंबई : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जची घटना देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज (२३ जुलै) वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचे...
फॅक्ट चेक: नागपूर रेल्वे स्थानकावरील मृत्यूची बातमी ठरली फेक,संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचे स्पष्ट!
नागपूर- रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली होती. मात्र, पुढील पडताळणीनंतर ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक सूत्रे आणि उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे संबंधित व्यक्ती जिवंत असल्याची अधिकृत पुष्टी झाली...
आंदोलनात सहभागी झाल्यास ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी? मुंबई पोलिसांवर काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांवर काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार,...
नागपूरच्या संविधान चौकात तणाव; राष्ट्रगीत गाऊन आंदोलनकर्त्यांनी दिले पोलिसांच्या कारवाईला उत्तर
नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी नागपुरातील संविधान चौकात सीजेपीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र, परवानगीची वेळ संपल्यानंतरही आंदोलक ठिय्या देऊन बसल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही...
नागपुरात किरकोळ वादाचे हिंसक रूप; लोखंडी रॉडने दुकानदारावर हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा
नागपुरातील सक्करदरा परिसरात दुकानासमोरील लोखंडी प्लेट हटवण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. शेजारील फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी झेरॉक्स दुकान चालकाला बेदम मारहाण करत लोखंडी रॉडने गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सक्करदरा पोलिसांनी...
नागपुरात ‘अन्ना गँग’चा पुन्हा धुमाकूळ;सीताबर्डीत अवघ्या ५ मिनिटांत दोन कार फोडून लॅपटॉप लंपास
नागपुरात पुन्हा एकदा 'अन्ना गँग' सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. शहरातील वर्दळीच्या सीताबर्डी परिसरात अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने दोन कारचे काच फोडून लॅपटॉप आणि मौल्यवान साहित्य चोरी करण्यात आले. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, यापूर्वीही शहरातील विविध...
आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर; पंढरीत लाखो वारकऱ्यांची मांदियाळी!
पंढरपूर : आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह वारकऱ्यांचे जत्थे पंढरीत पोहोचत आहेत. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि...
प्रेमसंबंधामुळे सर्वाधिक महिला घर सोडतात; बेपत्ता प्रकरणांवर विधानसभेत फडणवीसांनी मांडली आकडेवारी!
मुंबई -महाराष्ट्रातील बेपत्ता महिला आणि नागरिकांच्या घटनांवरून विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली. विरोधी पक्षांनी महिलांच्या आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, बेपत्ता झालेल्या सर्व व्यक्तींचे अपहरण...
नागपुरात छत फोडून मोबाईल दुकानात धाड; आयफोनसह ६.२४ लाखांचा ऐवज लंपास
नागपुर: नागपुरातील गणेशपेठ परिसरात एका सराईत चोरट्याने अक्षरशः चित्रपटातील शैलीत चोरीची धाडसी घटना घडवली आहे. दुकानाचे शटर न तोडता थेट छत फोडून मोबाईल दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता याच चोरट्याने शेजारील बार...
RTI मधून मोठा खुलासा, महाराष्ट्रात 1,292 पोलीस ठाणे; नागपूर विभागात 89 ची नोंद!
नागपूर : महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेबाबत माहितीच्या अधिकारातून (RTI) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) कार्यालयाने दिलेल्या उत्तरानुसार, राज्यात सध्या 1,292 मंजूर पोलीस ठाणे कार्यरत आहेत. 17 जुलै 2026 रोजी देण्यात आलेल्या या उत्तरात जिल्हानिहाय तसेच आयुक्तालयनिहाय पोलीस...
राहुल गांधींची नौटंकी सुरू,काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपरफुटी;बावनकुळे यांचा हल्लाबोल!
नागपूर : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण केले जात असून राहुल गांधी केवळ नौटंकी करत असल्याचा आरोप त्यांनी...
नागपुरात बँक फसवणुकीचा प्रकार; बनावट आधार कार्डच्या आधारे 26 लाखांचा बेअरर धनादेश वटवला
नागपूर : शहरातील मेडिकल चौक येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून बेअरर धनादेश लंपास करून बनावट आधार कार्डच्या आधारे 26 लाखांची रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला...
नागपुरात ब्लॅक डॉग, जेमसन, डेव्हर्ससह जॉनी वॉकर ब्लॅक लेबलच्या बाटल्या लंपास; अकोला वाईन मार्टमध्ये चोरी !
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासुदेव नगर मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत प्रीमियम मद्याच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण ३८ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला वाईन मार्टचे व्यवस्थापक अजय...
नागपुरात घरात शिरून ११ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; आरोपीला ‘पॉक्सो’खाली अटक!
नागपूर - घरात झोपलेल्या ११ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला इमामवाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. तुषार बिसेन सोनवानी (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे इमामवाडा परिसरात तीव्र संताप...
नागपुरात सराईत चोर अटकेत; टाइल्स शोरूम फोडून चोरीचा उलगडा, ११ जुन्या गुन्ह्यांचीही कबुली
नागपूर : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका टाइल्स शोरूममध्ये शटर फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे. ओमप्रकाश पूनम लहरे (रा. कळमना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दिवसाच्या वेळी बंद दुकाने आणि घरांची पाहणी करून...
कन्हानमध्ये नशायुक्त ट्रामाडॉल गोळ्यांचा साठा जप्त; ग्रामीण पोलिसांच्या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) कन्हान परिसरात मोठी कारवाई करत नशायुक्त ट्रामाडॉल गोळ्यांचा अवैध साठा जप्त केला. मंगळवारी उशिरा रात्री गुप्त माहितीच्या आधारे कन्हान-रामटेक मार्गावरील आणि कन्हान नदी परिसरातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका...
नागपुरात गँगवॉरनंतर कारवाई; मकोका आरोपी अजय चिंखेडेच्या अवैध साम्राज्यावर बुलडोझर!
नागपूर : पाचपावली परिसरात झालेल्या गँगवॉर आणि गोळीबार प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मकोका आरोपी अजय चिंखेडे आणि त्याच्या साथीदारांनी उभारलेल्या अवैध बांधकामांवर महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुलडोझर चालवत अतिक्रमण हटविले. कमाल चौकातील शनिचरा बाजार परिसरात...

