नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासुदेव नगर मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत प्रीमियम मद्याच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण ३८ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला वाईन मार्टचे व्यवस्थापक अजय खुशालराव वाकडे (वय ४२) यांनी २० जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. २१ जुलै रोजी सकाळी सुमारे ७ वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटरचे कुलूप तुटलेले दिसले. अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून ब्लॅक डॉग, जेमसन, डेव्हर्स आणि जॉनी वॉकर ब्लॅक लेबल या प्रीमियम मद्याच्या ७५० मिलीच्या प्रत्येकी एक बाटली तसेच दुकानातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
या चोरीतील मुद्देमालाची एकूण किंमत ३८ हजार ३५० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
अजय वाकडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.




