Published On : Thu, Jul 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीत मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या गणवेशावर नेमप्लेटच नव्हती; नागपूरच्या तरुणाचा गंभीर आरोप

Advertisement

नागपूर: दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी नागपूरच्या एका तरुणाने गंभीर आरोप केले आहेत. शुभम मुन या तरुणाने, मारहाण करणाऱ्या काही पोलिसांच्या गणवेशावर नेमप्लेट नसल्याचा दावा केला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आरोपांची चर्चा रंगली आहे.

शुभम मुन सध्या नागपुरात परतला असून, त्याने माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलन सुरू असताना तो आपल्या राहत्या खोलीकडे जात होता. त्यावेळी काही पोलिसांनी कोणतीही विचारपूस किंवा कारण न देता त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याने केला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, मारहाण करणाऱ्या काही पोलिसांच्या गणवेशावर नेमप्लेट नसल्यामुळे त्यांची ओळख पटवता आली नाही, असा दावा शुभमने केला. त्यामुळे संबंधितांवर तक्रार करणे किंवा त्यांची ओळख निश्चित करणे कठीण झाल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे अधिकृत पडताळणी झालेली नाही. तसेच, शुभम मुन यांनी केलेल्या आरोपांवर दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Advertisement

या प्रकरणामुळे आंदोलनादरम्यान पोलिसांच्या ओळखीसंदर्भातील नियम आणि कारवाईच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.