Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गँगवॉरनंतर कारवाई; मकोका आरोपी अजय चिंखेडेच्या अवैध साम्राज्यावर बुलडोझर!

Advertisement

नागपूर : पाचपावली परिसरात झालेल्या गँगवॉर आणि गोळीबार प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मकोका आरोपी अजय चिंखेडे आणि त्याच्या साथीदारांनी उभारलेल्या अवैध बांधकामांवर महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुलडोझर चालवत अतिक्रमण हटविले. कमाल चौकातील शनिचरा बाजार परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

१६ जुलैच्या मध्यरात्री पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिचरा बाजार परिसरात दोन कुख्यात टोळ्यांमध्ये गँगवॉर आणि गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही टोळ्यांतील दहा आरोपींना अटक केली होती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


तपासादरम्यान मकोका आरोपी अजय चिंखेडे याच्यासह राहुल शिंदे, दुर्गेश गुप्ता, अश्विन उर्फ अच्छी इंदुरकर आणि क्रिश ठाकूर यांनी शनिचरा बाजार परिसरात अवैधरित्या दुकाने उभारून अतिक्रमण केल्याचे समोर आले.

यानंतर सोमवारी सायंकाळी नागपूर पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने कमाल चौकातील शनिचरा बाजारात कारवाई करत बुलडोझरच्या सहाय्याने ही अवैध बांधकामे जमीनदोस्त केली. कारवाईदरम्यान संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Advertisement

गुन्हेगारी आणि अवैध अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्वीकारल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.