Published On : Wed, Jul 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सराईत चोर अटकेत; टाइल्स शोरूम फोडून चोरीचा उलगडा, ११ जुन्या गुन्ह्यांचीही कबुली

Advertisement

नागपूर : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका टाइल्स शोरूममध्ये शटर फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे. ओमप्रकाश पूनम लहरे (रा. कळमना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी दिवसाच्या वेळी बंद दुकाने आणि घरांची पाहणी करून रात्री चोरी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धमान नगर येथील टाइल्स शोरूमचे शटर फोडून आरोपीने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉवरमधील २ हजार रुपये रोख, सुमारे १२ हजार रुपये किमतीचे २० पितळी नळ आणि अंदाजे १,६०० रुपयांची ग्राइंडर मशीन असा मुद्देमाल चोरून नेला. सुदैवाने दुकानात मोठी रोकड नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.

घटनेची तक्रार मिळताच लकडगंज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि फुटेजच्या आधारे ओमप्रकाश लहरे याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वीच चोरीचे ११ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.