Published On : Thu, Jul 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

आंदोलनात सहभागी झाल्यास ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी? मुंबई पोलिसांवर काँग्रेसचा गंभीर आरोप

Advertisement

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांवर काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आल्याचे पक्षाने म्हटले आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा आंदोलनात दिसल्यास “ड्रग्जची पावडर टाकून गुन्हा दाखल करू, जामीनही मिळणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठे चित्रित करण्यात आला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असतील तर ते अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. देशभरात आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल करण्याच्या घटनाही समोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला विविध विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, त्याला काही विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

Advertisement

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आंदोलकांवर कठोर कारवाई न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार करण्याची मागणी करत, सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.