नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई; नंदनवन परिसरातून आरोपीकडून बंदुकीसह जिवंत काडतूस जप्त
नागपूर : शहरातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मध्यरात्री कारवाई करत नंदनवन परिसरातून एका आरोपीला अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूसासह ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 11 नोव्हेंबर रोजी रात्री 00.10 वाजेपासून पहाटे...
Nagpur Municipal Reservation: नागपूरमध्ये यंदा 76 नगरसेविका, 75 नगरसेवक — महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत आज (11 नोव्हेंबर) सकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर नागपूर महापालिकेचे राजकीय गणित स्पष्ट झाले असून, एकूण 151 नगरसेवकांच्या जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. यामुळे...
नागपुरात ऑपरेशन थंडरचा धडाका;मानकापूरमध्ये एमडी पावडरसह तिघांना अटक, एक फरार !
नागपूर:नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाने मानकापूर परिसरात धडक कारवाई करत मोठा ड्रग्ज साठा उघडकीस आणला आहे. राज अपार्टमेंटसमोर, इलेक्शन हॉस्पिटलच्या मागे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून तिघा संशयितांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी 52 ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाईल, एक...
नागपूरच्या वर्धा रोडवरील गोवारी उड्डाणपुलावरील गतिरोधकांवर नागरिकांचा संताप; मनपाकडे तक्रारींचा पाऊस
कन्हान 900 मिमी फीडर मेनवरील गळती दुरुस्तीकरिता नियोजित 12 तासांचा शटडाऊन
नागपूर, : जगनाडे चौक परिसरात 900 मिमी व्यासाच्या फीडर मेनमध्ये मोठी गळती आढळली आहे. भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यासाठी नागपूर महानगरपालिका (NMC) तर्फे कन्हान 900 मिमी फीडर मेनवर १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. हा...
भाजपचा निर्णय स्पष्ट;स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा
नागपूर : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात महायुतीबाबतची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. दोन महिन्यांमध्ये राज्यभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे....
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात बॉम्ब स्फोट; एकाचा मृत्यू
नवी दिल्ली - दिल्लीच्या प्रसिद्ध लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एक वाहनात जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या काच फाटल्या, तर स्फोटाच्या जागेवर असलेल्या दोन वाहनांना आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत कमीत कमी एका...
नागपूरच्या रविभवनात दोन अभियंत्यांमध्ये शीतयुद्ध; मॅटच्या स्थगितीनंतर उपअभियंता उपाध्ये पुन्हा रुजू
नागपूर- राज्याच्या लोकनिर्माण विभागात (PWD) सध्या प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. रविभवन विभागात दोन उपविभागीय अभियंत्यांमध्ये थेट शीतयुद्ध सुरू झालं आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांची बदली मुख्य अभियंता कार्यालय, नागपूर येथे केली होती. निवृत्तीला फक्त महिनाभर...
नागपूरमध्ये वाहनचोरी प्रकरणाचा उलगडा; दोन तरुण आरोपींच्या अटकेनंतर तीन दुचाकी पोलिसांच्या ताब्यात!
नागपूर - सोनेगाव पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणातील दोन तरुणांना अटक करून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईनंतर परिसरातील वाहनचोरांचा धसका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते २८ ऑक्टोबरच्या सकाळी...
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिले ‘हे’ उत्तर
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशाच एका कार्यक्रमात बेंगलोर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित राहून अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी...
महाराष्ट्रात आजपासून नगरपालिका निवडणुकीचा बिगुल; अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम आजपासून अधिकृतपणे सुरू झाला आहे. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील या निवडणुकांसोबतच...
ब्रेकअपनंतर महिलेशी छेडछाड; नागपुरातील रिअल इस्टेट व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
नागपूर – प्रेमसंबंध तुटल्यानंतर महिलेशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी रिअल इस्टेट व्यवसायिक अजय लाखनकर (५५, रा. बेसा) याच्याविरोधात छेडछाड, धमकी आणि अभद्र वर्तनाचे गुन्हे दाखल केले आहेत. ३८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची ओळख...
नागपुरात विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणारा व्हॅनचालक पोलिसांच्या ताब्यात!
नागपूर : ट्युशन क्लासला ने-आण करणाऱ्या व्हॅनचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील बोलणे आणि छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी लीलाधर मनसाराम समर्थ (३७, रा. नागपूर) याला पालकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वानाडोंगरी आणि हिंगणा परिसरातील...
नागपूरकर मंत्रमुग्ध;खासदार सांस्कृतिक महोत्सवात शिव महिम्न स्तोत्र पठणाने गुंजला भक्तीचा स्वर!
नागपूर : ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’च्या “जागर भक्तीचा” या अध्यात्मिक उपक्रमांतर्गत सोमवारी सकाळी झालेल्या शिव महिम्न स्तोत्र पठणाने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगण भक्तिरसाने भारावले. भगवान शिवाच्या महिमेचे वर्णन करणाऱ्या या स्तोत्र पठणात शेकडो महिला आणि पुरुष भक्त एकसुरात सामील झाले....
कला व संस्कृतीमुळेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास टिकेल: डॉ.अशोक उईके
गडचिरोली: आदिवासींची कला व संस्कृती महान असून, त्यांचा इतिहास गौरवशाली आहे. कला व संस्कृतीची जपणूक केली तरच हा गौरवशाली इतिहास टिकेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले. भगवान बिरसा कला मंच व कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था यांच्या...
कन्हान पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा कोळसा जप्त, २४ चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळसा चोरी करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा कोळसा जप्त करत तब्बल २४ कोळसा चोरांना आरोपी ठरवले आहे. ठाणेदार जयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान...
मनसे काँग्रेसच्या विचारसरणीशी सुसंगत नाही, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही; वडेट्टीवारांचा ठाम इशारा
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू अलीकडे अनेक मंचांवर एकत्र दिसत असल्याने महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, काँग्रेसने या...
विदर्भात थंडीची चाहूल; गोंदियात 11.5 अंश तर नागपुरातही तापमान घसरले!
नागपूर : विदर्भात हिवाळ्याने आता खऱ्या अर्थाने प्रवेश केला आहे. रविवारी सकाळी अनेक जिल्यांत दवबिंदू, धुकं आणि गार वाऱ्यांचा अनुभव आला. गोंदिया 11.5 अंश सेल्सिअसवर थंडीत गारठला असून तो विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. तर भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि...
आज गली गली नागपूर सजायेंगे,राम आएंगे…; गायक विशाल मिश्राच्या सुरांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवात रंगत!
गणेशपेठ परिसरात मतीमंद तरुणीवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी अटक
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतीमंद २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मतीमंद असून ती आपल्या कुटुंबासोबत गणेशपेठ परिसरात राहते....
नागपुरात 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम; खासदार सांस्कृतिक महोत्सवाने रचला इतिहास!
Note: This is to inform that nagpurtoday.in has no official whatapps group. We are not related to any whatapps group with similar names.
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145






