सरकारी नोकरीत असूनही ‘लाडकी बहीण’;नियमबाह्य लाभ घेणाऱ्या २,२८९ कर्मचाऱ्यांवर कारवाई
मुंबई: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राज्यातील तब्बल २,२८९ महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी अयोग्यरीत्या या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असून, या सर्व लाभार्थींना दिला जाणारा मासिक ₹१५०० चा भत्ता तात्काळ थांबवण्यात आला आहे. यामुळे...
डीसीपी ट्राफिक लोहित मतानी यांनी घेतला कार्यभार; नागपूरच्या वाहतूक समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्याची मांडली भूमिका!
नागपूर : शहरातील वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपयुक्त (डीसीपी ट्राफिक) म्हणून लोहित मतानी यांनी आजपासून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच त्यांनी नागपूरच्या वाढत्या वाहतूक समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडली. नवीन डीसीपी यांनी स्पष्ट केलं की, शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे ट्राफिक जाम...
राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप
मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एका गडद वास्तवात रूपांतरित होत चाललेल्या असून, या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “आकड्यांमधून...
थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी सरकार सज्ज; आमदार विकास ठाकरे यांच्या प्रश्नावर मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे आश्वासन
नागपूर : राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांना होणाऱ्या अडचणींबाबत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले. यावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी याची गांभीर्याने दखल घेत, रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या औषधांच्या दर्जाबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. विधानसभेत...
धान खरेदी योजनेत शेतकऱ्यांच्या नावावर दलालांचा फायदा ; नाना पटोलेंचा विधानसभेत आरोप
भंडारा : राज्यात सुरू असलेल्या धान खरेदी योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून, शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा दलालांच्या खिशात जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला. पटोले म्हणाले, "केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात धान खरेदी योजना राबवली...
नागपुरातील हॉटेल पॅराडाइजमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; रशियन महिलेची सुटका, एका महिलेला अटक
नागपूर : शहरातील मध्यवर्ती कॅ रोडवरील हॉटेल पॅराडाइजमध्ये सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) मोठी कारवाई केली. या धाडीत पोलिसांनी एका रशियन महिलेची सुटका केली असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई...
बनावट लेटरहेड, सहीसह…; आमदार लाड यांच्या नावाने ३ कोटींचा निधी लाटण्याचा प्रयत्न
मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा वापर करून ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लाड यांच्या बनावट लेटरहेडवर, खोट्या सह्यांनी आणि त्यांच्याच आवाजात एआयच्या माध्यमातून फोन करून...
ऑपरेशन थंडर : नागपूर शहरात अमलीपदार्थ विरोधात सघन लढा
अमलीपदार्थ सेवन हे एक गंभीर सामाजिक व आर्थिक संकट आहे. त्यामुळे तरुणपिढी बरबाद होते, गुन्हेगारी वाढते, कुटुंबं उद्ध्वस्त होतात आणि आरोग्यावर भयंकर परिणाम होतो. नागपूर शहर पोलिसांकडून "ऑपरेशन थंडर" या मोहिमेअंतर्गत अमलीपदार्थांच्या विरोधात व्यापक...
कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बैठकीत इशारा
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोराडी येथे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालविण्यात यावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास आणखी निधीची तरतूद करण्यात येईल. मात्र, आता यामध्ये कुचराई केलेली खपवून घेणार नाही असा...
नागपूरमध्ये लग्न समारंभात युवकाचा खून; ९ आरोपींविरोधात मोक्का कारवाई, मुख्य आरोपीला अटक
नागपूर : शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्न समारंभात झालेल्या हल्ल्यात युवकाचा खून झाल्याची गंभीर घटना २० फेब्रुवारी २०२५ रोजी समोर आली होती.विहांग मनिष रंगारी (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे.या प्रकरणात मुख्य आरोपीसह एकूण ९ जणांविरोधात मोक्का अंतर्गत...
नागपुरातील वाठोडा हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, एका आरोपीला अटक
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सर्गममध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर सामाजिक सुरक्षा शाखेने (SSB) मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई १ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी...
शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात १६ जुलै रोजी निर्णायक सुनावणी
नवी दिल्ली – शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पोहोचला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट...
ड्रग्स तस्करीविरोधात कठोर पावले, मकोका अंतर्गत कारवाई होणार;मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई – अंमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर सरकारने आता धडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा करत सांगितले की, आता ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) लावला जाणार आहे. विधान परिषदेत ड्रग्स...
नागपुरात मानसिकदृष्ट्या विकृत आरोपीने अल्पवयीन मुलींची केली छेडछाड; पाच दिवसांनी पोलिसांनी आरोपीला केली अटक
नागपूर: मानकापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोधनी येथील कोलतेनगरमध्ये अलिकडेच एका खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जिथे एका मानसिकदृष्ट्या विकृत आरोपीने दोन घरात घुसून लहान मुलींसोबत आक्षेपार्ह कृत्य केले. पाच दिवसांच्या सतत पोलिस तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीचे...
नागपूर पोलीस विभागात मोठे फेरबदल; निकेतन कदम यांची ट्रॅफिक डीसीपीपदी नियुक्ती
नागपूर : शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून, निकेतन कदम यांची ट्रॅफिक शाखेचे डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी मंगळवारी नवीन नियुक्त्यांची घोषणा केली असून, दोन नवीन डीसीपींनीही आपल्या पदभाराचा कार्यभार स्वीकारला...
“I Love You” म्हणणं अश्लीलता नाही; बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय
नागपूर : "I Love You" असं म्हणणं केवळ त्या वक्तव्यावरून अश्लीलता किंवा लैंगिक छळ मानता येणार नाही, असं स्पष्ट करत बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण आणि समाजाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फडके यांच्या खंडपीठाने एका शिक्षकाविरोधात दाखल...
प्रदेशाध्यक्षपदाच्या प्रवासात काही त्रुटी राहिल्या असतील तर क्षमा करा; महसूल बावनकुळे यांचं भावनिक पत्र
मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदात बदल झाले असून, कार्यकारी अध्यक्षपद भूषवणारे रविंद्र चव्हाण यांची नव्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावुक पत्र लिहीत आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे....
विकास ठाकरे यांनी घेतला पश्चिम नागपूरच्या ८४ झोपडपट्ट्यांचा आढावा;
नागपूर: पश्चिम नागपूरचे आमदार तसेच नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील ८४ झोपडपट्ट्यांमधील पट्टे वाटपाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना हक्काचे पट्टे...
नागपुरातील महफिल स्मोक शॉपवर छापा; ई-सिगारेट, हुक्का साहित्यासह 3.36 लाखांचा मुद्देमाल जप्त!
-एन.डी.पी.एस. पथकाची कारवाई नागपूर :शहरातील धरमपेठ परिसरातील महफिल स्मोक शॉपवर एन.डी.पी.एस. पथकाने मोठी कारवाई करत ई-सिगारेट, परदेशी सिगारेट आणि हुक्का संबंधित साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, माता मंदिर रोडवरील चिल्ड्रन ट्रॅफिक...
करदात्यांची ऑनलाईन मालमत्ता कर भरणा करण्यास पसंती
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी मनपा वेबसाईट, माय नागपूर मोबाईल ॲप आणि व्हॉटसअपवरील माय नागपूर एनएमसी चॅटबॉट या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती चांगली वाढली असून गेल्या तीन...
देखभाल व दुरुस्तीसाठी काही भागात मंगळवार वीज नाही
नागपूर: बुधवार, २ जुलै रोजी शहरातील काही भागांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या कामांमुळे महाल भागात सकाळी ८:३० ते दुपारी १२ या...