नागपुरात गुन्हेगारीचा वाढता कहर; कुकरेजा सनसिटी रहिवाशांचा पोलीस आयुक्तांकडे थेट निवेदन
नागपूर :शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नुकत्याच कुकरेजा सनसिटी (दीक्षित नगर) येथे घडलेल्या खूनाच्या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी नागपूरचे पोलीस आयुक्त यांना थेट निवेदन सादर केलं आहे. या निवेदनात रहिवाशांनी कापिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरातील...
हर्षवर्धन सपकाळ अजून खूप छोटे…; बावनकुळे यांचा टोला
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारकडे निधी नाही, अशा आशयाची टीका केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बावनकुळे यांनी लिहिलं की, सपकाळ अजून खूप छोटे आहेत, मोठं...
सोन्याने केला नवा विक्रम; प्रथमच एका तोळ्याचा दर लाखाच्या पार
नागपूर: एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे, तर दुसरीकडे सोन्याचे दरही सातत्याने उच्चांक गाठत आहेत. सोमवारी, सोन्याने इतिहास रचला आहे. २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रथमच एका लाख रुपयांच्या वर गेला आहे. कमजोर डॉलर आणि अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित...
नागपूरच्या महाल परिसरात तणाव;भाजप-काँग्रेस आमनेसामने,’हे’ कारण आले समोर !
नागपूर: शहराच्या ऐतिहासिक महाल भागात राजकीय धुमश्चक्री पुन्हा एकदा उफाळून आली आहे. सोमवारी सकाळी गांधीगेट परिसरात भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला भ्रष्टाचारी ठरवत भाजप कार्यकर्ते शहर काँग्रेस कार्यालय ‘देवाडिया भवन’कडे कूच करू लागले. मात्र, पोलिसांनी...
नागपूर विधानभवन विस्तार; अधिग्रहणासाठी नवीन मूल्यांकन, सभापतींचे उच्चस्तरीय समितीसाठी निर्देश
नागपूर – नागपूर येथील विधानभवन संकुलाच्या विस्तार कामांना गती देण्यासाठी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. येत्या काळात सदस्यसंख्या वाढणार असल्याने बसण्याची व्यवस्था व आवश्यक सुविधा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. सभापती शिंदे म्हणाले, "जसे दिल्लीला नवीन संसद भवन...
नागपूर महापालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान
नागपूर: महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दिल्या जाणारा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना मुंबईत नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी...
गांधीनगर शारदा महिला मंडळ व भाजपा महिला आघाडी तर्फे चैत्र गौरी हळदी-कुंकू व विविध स्पर्धांचे आयोजन
गांधीनगर शारदा महिला मंडळ आणि भाजपा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र गौरी हळदी-कुंकू कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका परिणीता ताई फुके, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रगती ताई पाटिल, तसेच...
नागपूरसह विदर्भ तापले; सलग दुसऱ्या दिवशीही तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर
नागपूर – उपराजधानी नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शनिवारीच्या तुलनेत रविवारी 0.7 अंशांची किंचित घट झाली आहे. मात्र उन्हाचा तीव्रपणा कायम असून नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील हवामान दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. एप्रिल महिन्यात...
नागपूरच्या कपिल नगर हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, सुपारी देऊन हत्या, ४ अल्पवयीनांसह ६ जण ताब्यात
नागपूर: शहराच्या कपिल नगर हत्याकांडामध्ये मोठा खुलासा झाला आहे. ही हत्या सुपारी देऊन घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. हत्येप्रकरणी ४ अल्पवयीनांसह ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकुश कडू (वय ५४), हे गुरु तेगबहादूर नगर, नारी रोड येथील रहिवासी...
राज्याला नवे माहिती आयुक्त; राहुल पांडे यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती
मुंबई:मुंबईतील राजभवन येथे आज एक महत्त्वपूर्ण शपथविधी सोहळा पार पडला. राहुल पांडे यांनी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली. त्यांच्या बरोबर रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनी राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित...
नागपूर पोलिसांची कारवाई;बोगस नंबर प्लेट लावलेल्या वाहनांचा पर्दाफाश,८ वाहने जप्त
नागपूर: शहरात दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १:२४ वाजता वॉकहार्ट हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर नागपूर वाहतूक पोलिसांनी MH 20 DZ 5061 नंबर असलेल्या वाहनाची तपासणी केली असता, संबंधित वाहनावर बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाच्या...
नागपुरात हत्या सत्र सुरूच;पाचपावली परिसरात युवकाची चाकूने हत्या
नागपूर :शहरात गुन्हेगारीचं सत्र थांबायचं नाव घेत नाही. यावेळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री एका युवकाची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मृत युवकाचं नाव शेरा सूर्यप्रकाश मलिक (वय ३२, रा. ठक्करग्राम, पाचपावली) असं आहे. मिळालेल्या...
हिंदू समाजाने ‘एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी’ या तत्वाला स्वीकारावे; मोहन भागवत यांचे आवाहन
अलीगढ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या अलीगढच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असून, या प्रवासात त्यांनी स्वयंसेवकांना सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढवण्याचा मोलाचा संदेश दिला आहे. स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत म्हणाले की, "हिंदू समाजाने ‘एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी’ या...
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार म्हणून अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय; ‘सामना’तून हल्लाबोल
मुंबई :राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन वेगळी वाट चोखाळलेले नेते आता पुन्हा एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत...
महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्शांचे वाटप
नागपूर: महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ५० पात्र महिला लाभार्थींना पिंक ई-रिक्शांचे वितरण केले. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात येत असून, महिलांना सुरक्षित प्रवास व रोजगाराच्या संधी...
दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण गरजेचे – केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी
नागपूर - शिक्षणाचा संबंध जसा ज्ञानाशी आहे. आपल्याला असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढत असते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री...
नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
नागपूर: नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण रविवारी (ता. २०) माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद हाऊसमध्ये करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. रविंद्र सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ....
आश्चर्यजनक! नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये घरावर कोसळला ५० किलोचा धातूचा अवजड तुकडा
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात शनिवारी पहाटे एक अजब घटना घडली असून, कोसे लेआऊट भागात एका घरावर आकाशातून धातूचा प्रचंड मोठा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे पहाटे चारच्या सुमारास जोरदार आवाज होऊन स्थानिक रहिवाशांची झोपमोड झाली. काही वेळातच लोकांनी...
ना. श्री. नितीन गडकरी यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’
नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट (डी. एस्सी., डॉक्टर ऑफ सायन्स) प्रदान करण्यात आली. या डॉक्टरेटमुळे ना. श्री. गडकरी यांच्या शिरपेचात आणखी एक...
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कामठी आणि रनाळा क्षेत्रात शिबिराचे यशस्वी आयोजन
नागपूर : राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातंर्गत आयोजित गृहपयोगी साहित्य संच वाटप शिबिराला बांधकाम कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. १ एप्रिल पासून सुरू झालेल्या...
नियमांचे उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द!
मुंबई: राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून, राज्यातील सर्व ५७ वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला...