
यावेळी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर व आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आनंद परांजपे उपस्थित होते.या पार्श्वभूमीवर शिवानी दाणी यांचे नाव नागपूरच्या राजकीय वर्तुळात प्रकर्षाने चर्चेत आले आहे. दाणी या प्रभाग क्रमांक ३६ मधील भाजपच्या उमेदवार होत्या. सोबतच प्रभाग 12 मधील भाजपच्या उमेदवार साधना बरडे यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. .
राज्यात लागू असलेल्या 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार यंदा 29 पैकी 15 महापालिकांमध्ये महिला महापौर होणार आहेत. त्यात नागपूरचा समावेश असल्याने शहराच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. उर्वरित 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे. महिला आरक्षणांतर्गत 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू झाले आहे.
राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान झाले होते, तर 16 जानेवारीला मतमोजणी पार पडली. त्यानंतर आज महापौर आरक्षण जाहीर झाल्याने आता महापौर निवडीच्या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
नागपूरमध्ये राजकीय हालचालींना वेग-
नागपूर महापालिकेचे महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यानंतर शहरातील सर्व प्रमुख पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. पक्षांतर्गत बैठका, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि राजकीय गणिते पुन्हा एकदा मांडली जात आहेत. विशेषतः सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून महिला चेहऱ्यांवर भर देण्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे.
शिवानी दाणी यांचे नाव चर्चेत-
या पार्श्वभूमीवर शिवानी दाणी यांचे नाव नागपूरच्या राजकीय वर्तुळात प्रकर्षाने चर्चेत आले आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव, स्थानिक पातळीवरील सक्रियता आणि महिला नेतृत्त्व म्हणून असलेली ओळख यामुळे त्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सत्तासमीकरण बदलणार?
महापौर आरक्षणामुळे नागपूर महापालिकेतील सत्तासमीकरण बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला महापौर निवडीमुळे प्रशासनात नवीन दिशा मिळेल, तसेच शहर विकासाच्या मुद्द्यांवर नव्या पद्धतीने विचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूरचा पुढील महापौर कोण असेल, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असून, “शिवानी दाणी नागपूरच्या महापौर बनणार का?” हा प्रश्न सध्या शहराच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे.








