नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी; राखीसाठी २४ तास टपाल बुकिंग सुविधा
नागपूर : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी आणि भेटवस्तू देश-विदेशातील नातेवाईकांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात, यासाठी टपाल विभागाने विशेष नियोजन केले आहे. झिरो माईल्स येथील एनएसएच (NSH) केंद्रावर २४ तास बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी आगाऊ बुकिंग करावे,...
आयुक्तांनी केली रामनगर मैदानाची पहाणी
नागपूर, नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी(ता.८) रामनगर मैदानाची पाहणी केली. यावेळी मनपाच्या क्रीडा विशेष समिती समिती श्रीमती दर्शनी धवड, मनपाचे उपायुक्त श्री. मंगेश खवले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह इतर अधिकारी उपद्रव शोध पथकाचे जवान...
प्रफुल गुडधे यांनी 48 तासांत माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा – दयाशंकर तिवारी
नागपूर: भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांना सार्वजनिक माफी मागण्याचा इशारा दिला आहे. गुडधे यांनी 48 तासांच्या आत माफी मागितली नाही, तर प्रतिमाहानीप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असे तिवारी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दयाशंकर...
बदनामी झाली तरी प्रसिद्धी मिळते, अशी त्यांची भूमिका;‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर फडणवीसांचा काँग्रेसला पलटवार
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. पत्रकारांशी संवाद...
राज्य मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, नवीन न्यायालयांनाही हिरवा कंदील
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत विकास, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. विशेषतः शेतकरी आणि शेतमजुरांसाठी दिलासादायक निर्णय घेत सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आणखी तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला....
शाळेत शिक्षकच नाहीत; विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच भरवला वर्ग, अनोख्या आंदोलनाने प्रशासनाला जाग!
भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोरणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षण विभागाच्या दालनाबाहेरच वर्ग भरवला. या अनोख्या आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर...
शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; महाराष्ट्रावर शोककळा
कोल्हापूर : शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार...
नालेसफाईवर ५२ कोटी उधळले…तरी नागपूर बुडाले; जबाबदार कोण?आरटीआय कार्यकर्त्याचा सवाल
नागपूर : शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भाग जलमय झाले, तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. दरवर्षी नालेसफाई आणि नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जाते. मात्र, एवढा खर्च करूनही शहरात पूरस्थिती का...
नागपुरात ‘मेडिकल इमर्जन्सी’चे कारण सांगून सेकंडहँड कारच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक!
fraud नागपूर : सेकंडहँड कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची १ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे कार कमी किमतीत विकली जात असल्याचे सांगत आरोपीने विश्वास संपादन केला. कारची...
एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा; रेस्टॉरंटच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करावी लागू शकते
मुंबई: नवी मुंबईतील एका बार अँड रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत आस्थापनाने १०० टक्के नियमांचे पालन केल्याचे स्पष्ट झाले. तरीही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए)वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती...
लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी; कळमना पोलिसांनी 24 तासांत उघड केला गुन्हा
नागपूर: लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन चोरट्यांना कळमना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद करत सुमारे 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त...
पूरग्रस्त भागांची पाहणी; आमदार विकास ठाकरे यांची तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी
नागपूर: रोजी झालेल्या पावसामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रशांत नगर, सादिकाबाद, मानसरोवर नगर, झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा, महेश नगर, स्वागत नगर, सूरज नगर व इतर निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले. सांडपाण्यासह आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान...
नागपुरातील ‘एक्झोटिका स्पा’मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मालकासह दोघे अटकेत
नागपूर : नागपूर शहरातील वाठोडा परिसरातील एक्झोटिका स्पा येथे सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत स्पाच्या मालकासह दोन जणांना अटक करण्यात आली असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर स्पाचे व्यवस्थापन...
नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात ‘दारू पार्टी’; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?
नागपूर : ज्या इमारतीतून संपूर्ण नागपूर शहराचा प्रशासकीय कारभार चालतो, जिथे शहराच्या विकासाचे निर्णय घेतले जातात आणि नागरिकांच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या यंत्रणेचे नियंत्रण केले जाते, त्याच नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यालयाच्या सहाव्या मजल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या...
वर्ध्यात ट्रान्सजेंडर महिला वकिलाचा विवाह; चार वर्षांच्या प्रेमाला वैदिक विधींनी मिळाली नवी ओळख
वर्धा : वर्ध्यातील ट्रान्सजेंडर महिला वकील शिवानी सुरकार आणि बँक कर्मचारी नितीन सोलंके यांनी चार वर्षांच्या प्रेमसंबंधाचे विवाहबंधनात रूपांतर करत समाजासमोर स्वीकार, समानता आणि प्रेमाचा आदर्श ठेवला आहे. विशेष विवाह अधिनियमांतर्गत विवाहाची नोंदणी केल्यानंतर दोघांनी अमरावती येथील लाखनवाडी हिंदू मंदिर...
वर्षभरासाठी तडीपार… तरीही नागपुरात वावर; ‘चाकू’ला तहसील पोलिसांनी पकडले
नागपूर : नागपुरातील तडीपार गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. वर्षभरासाठी नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार सोहेल उर्फ 'चाकू' मोईनुद्दीन अन्सारी याला तहसील पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे वावरताना अटक केली. आरोपी तडीपार आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे उघड...
नागपुरातील चर्चित तरुणी ‘आशी डे’चा मृतदेह कान्हान नदीत; हत्येचा संशय!
नागपूर : नागपूर शहरातील चर्चेत असलेल्या तरुणी आशी डे हिचा मृतदेह सोमवारी पहाटे नागपूर ग्रामीणमधील कान्हान नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत संशयास्पद मृत्यूचे संकेत मिळाल्याने कान्हान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून विविध शक्यतांचा...
खापरखेड्यात तलवारी-कोयत्यांचा थरार; दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे रविवारी रात्री दोन गटांतील जुन्या वादाने हिंसक वळण घेतले. तलवारी, कोयते, चाकू आणि काठ्यांनी झालेल्या हल्ल्यात अनेक युवक जखमी झाले असून, या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी ६ नामजद आरोपींसह १० ते १२ अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाच्या...
नागपुरात घरात एकटी असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार;आरोपीला अटक
नागपूर : नागपुरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटी असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप...
नाना पटोले यांचा व्हिडिओ व्हायरल; कार्यकर्त्यांकडून दुधाने पाय धुतल्याने राजकीय वाद
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना दिसत असून, या प्रकारामुळे...
नागपुरात E20 विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; गडकरी वाड्याकडे घेरावाचा प्रयत्न, गांधी गेटवर पोलिसांनी रोखले
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील गडकरी वाड्याला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. E20 इंधन धोरणाच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, गडकरी वाड्याकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांना...

