Published On : Tue, Aug 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नालेसफाईवर ५२ कोटी उधळले…तरी नागपूर बुडाले; जबाबदार कोण?आरटीआय कार्यकर्त्याचा सवाल

Advertisement

नागपूर : शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भाग जलमय झाले, तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. दरवर्षी नालेसफाई आणि नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जाते. मात्र, एवढा खर्च करूनही शहरात पूरस्थिती का निर्माण झाली, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी उपस्थित केला आहे.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत नागपूर महापालिकेने नालेसफाई आणि नदी स्वच्छतेच्या कामांवर ५२ कोटी १७ लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभय कोल्हारकर यांनी महापालिकेने नालेसफाईच्या कामांचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासावी आणि त्रुटी आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

त्यांच्या मते, शहरातील वाढत्या सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाणी तुंबण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि वैज्ञानिक नियोजनाची गरज आहे.

Advertisement

तसेच, शहरातील काही भागांमध्ये पाणी साचले नाही, तर काही भाग पूर्णपणे जलमय झाले. त्यामुळे नेमकी त्रुटी कुठे आहे, याचा सखोल अभ्यास करून नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर होईल आणि भविष्यात पूरस्थिती टाळता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.