Published On : Tue, Aug 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पूरग्रस्त भागांची पाहणी; आमदार विकास ठाकरे यांची तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

Advertisement

नागपूर: रोजी झालेल्या पावसामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रशांत नगर, सादिकाबाद, मानसरोवर नगर, झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा, महेश नगर, स्वागत नगर, सूरज नगर व इतर निवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले. सांडपाण्यासह आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अन्नधान्य, विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, कपडे तसेच इतर घरगुती साहित्य पूर्णपणे खराब झाले.

या पार्श्वभूमीवर पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज बाधित भागांना भेट देऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नुकसानाची पाहणी केली. नागपूर महानगरपालिकेचे अभियंते देखील उपस्थित होते.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन बाधित भागांमध्ये तातडीने पंचनामे (सर्वेक्षण) करण्याचे तसेच प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

यावेळी आमदार ठाकरे यांनी सांगितले की, पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना नुकसानभरपाई वितरित करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संबंधित भागांतील पावसाच्या पाण्याचा निचरा, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलनिकासी यंत्रणा सक्षम करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.

Advertisement

आमदार विकास ठाकरे यांनी प्रशासनाला नागरिकांना त्वरित दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे आवाहन केले.

वन व झुडपी जंगलाच्या जमिनी अतिक्रमणमुक्त करा: विकास ठाकरे

नागपूर : पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज उपवनसंरक्षक (DCF) डॉ. विनिता व्यास यांची भेट घेऊन पश्चिम नागपुरातील वन विभागाच्या तसेच झुडपी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी केली.

विशेषतः झिंगाबाई टाकळी येथील टॉवर लाईन परिसरासह पश्चिम नागपुरातील विविध भागांमध्ये वन व झुडपी जंगलाच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे ठाकरे यांनी डॉ. व्यास यांच्या निदर्शनास आणून दिले. या अतिक्रमणांमुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहितीही त्यांनी या भारतीय वन सेवा (IFS) अधिकाऱ्यांना दिली.

वन व झुडपी जंगलाच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित जमिनी अतिक्रमणमुक्त कराव्यात, अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली.

Advertisement
निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी के जमाकर्ताओं की परेशानी

निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी के जमाकर्ताओं की परेशानी

"पहले भगवान को जोड़े हाथ... फिर उड़ाया चांदी का मुकुट और मंदिर की घंटी!  #NagpurNews #TempleTheft

"पहले भगवान को जोड़े हाथ... फिर उड़ाया चांदी का मुकुट और मंदिर...

पंकजा मुंडे भाजपा छोड़ें; वडेट्टीवार की अपील #vidarbhanews  #nagpur #newsupdate #vidarbha

पंकजा मुंडे भाजपा छोड़ें; वडेट्टीवार की अपील #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO  #LatestNews #CityNews #Justice

Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO #LatestNews #CityNews...

शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate

शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate

नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?

नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges