Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

खापरखेड्यात तलवारी-कोयत्यांचा थरार; दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

जीवघेण्या हल्ल्यानंतर परिसरात तणाव, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे रविवारी रात्री दोन गटांतील जुन्या वादाने हिंसक वळण घेतले. तलवारी, कोयते, चाकू आणि काठ्यांनी झालेल्या हल्ल्यात अनेक युवक जखमी झाले असून, या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी ६ नामजद आरोपींसह १० ते १२ अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने वार्ड क्रमांक २ मध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल प्रदीप जाने (वय १८) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रज्वल हा त्याचे मित्र हिमांशू कडू, रक्षित कापसे, रोहित मेश्राम, सिद्धांत सातनकर आणि पुनीत भगत यांच्यासह नागमंदिर चौकात उभा असताना आरोपींचा गट तेथे आला. सुरुवातीला कोयता फिरवून दहशत निर्माण करण्यात आली. त्यानंतर तलवारी, चाकू आणि काठ्यांनी बेछूट हल्ला करण्यात आला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हल्लेखोरांनी हिमांशू कडू याच्यावर त्याच्या घराजवळ जीवघेणा वार केला. तर मुख्य रस्त्यावरील चहाच्या टपरीजवळ रोहित मेश्राम आणि रक्षित कापसे यांना लक्ष्य करत बेदम मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी सूरज कावळे, संघर्ष बागडे, साहिल बागडे, शुभम उईके, सुदामा उर्फ डहाके यांच्यासह १० ते १२ अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमे, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व नामजद आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून धाडसत्र सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.