नागपूर : ज्या इमारतीतून संपूर्ण नागपूर शहराचा प्रशासकीय कारभार चालतो, जिथे शहराच्या विकासाचे निर्णय घेतले जातात आणि नागरिकांच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या यंत्रणेचे नियंत्रण केले जाते, त्याच नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यालयाच्या सहाव्या मजल्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काचेचे ग्लास आढळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महापालिकेचे मुख्यालय हे शासकीय कार्यालय आहे की रात्रीच्या पार्ट्यांचे ठिकाण?
हा प्रश्न आता नागपूरकर विचारू लागले आहेत. कारण, अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या इमारतीत दारूच्या बाटल्या पोहोचतातच कशा? त्या कोणी आणल्या? त्या कार्यालयातच वापरण्यात आल्या का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याची माहिती कोणालाच नव्हती का? महापालिकेच्या मुख्यालयात २४ तास सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचा दावा केला जातो.
मग या संपूर्ण प्रकाराची नोंद कॅमेऱ्यांमध्ये झाली नाही का? सुरक्षा रक्षकांनी कोणालाही रोखले नाही का? की सर्व काही माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करणारे प्रशासन आता स्वतःच्या मुख्यालयात घडलेल्या या प्रकारावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना जबाबदार धरले जाणार की हे प्रकरणही इतर अनेक फाईलींप्रमाणे दडपले जाणार, हा मोठा प्रश्न आहे. या घटनेमुळे केवळ महापालिकेच्या प्रतिमेलाच धक्का बसलेला नाही, तर नागपूरकरांच्या विश्वासालाही तडा गेला आहे.
नागपूर शहराला शिस्त आणि पारदर्शकतेचे धडे देणाऱ्या यंत्रणेच्या मुख्यालयातच असा प्रकार घडत असेल, तर सामान्य नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा? आता उत्तर देण्याची वेळ महापालिका प्रशासनाची आहे. सहाव्या मजल्यावर सापडलेल्या दारूच्या बाटल्यांचे गूढ उलगडणार की हा विषयही काही दिवसांत विस्मरणात जाणार? नागपूरकरांना आता चौकशी नव्हे, तर स्पष्ट उत्तर आणि कठोर कारवाईची अपेक्षा आहे.
Nagpur: नाबालिग छात्रा से दुष्कर्म का आरोप #nagpurnews #Crime #POCSO #LatestNews #CityNews...
शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म #Nagpur #NagpurNews #CrimeNews #NagpurPolice #NewsUpdate
नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात 'दारू पार्टी'; शहर चालवणाऱ्या कार्यालयात नेमकं चाललं तरी काय?
मिलावटी खाद्य पदार्थों पर सख्त कार्रवाई जारी #vidarbhanews #amravati #newsupdate #nagpurnews
"फेसबुक पर प्यार, होटल में दुष्कर्म... शादी का सपना" #NagpurNews #CrimeNews #Police...
Nagpur: एक साल से तड़ीपार बदमाश 'चाकू' गिरफ्तार #NagpurNews #crimenews #Tadipar #NagpurPolice





