Published On : Tue, Aug 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘मेडिकल इमर्जन्सी’चे कारण सांगून सेकंडहँड कारच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक!

Advertisement

fraud

नागपूर : सेकंडहँड कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची १ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ‘मेडिकल इमर्जन्सी’मुळे कार कमी किमतीत विकली जात असल्याचे सांगत आरोपीने विश्वास संपादन केला. कारची कागदपत्रे, चावी आणि करारपत्रही दाखवले; मात्र पैसे घेतल्यानंतर तो फरार झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील स्वरूप प्रांजळे यांची आरोपी हर्ष शास्त्रकार याच्याशी गेल्या दोन वर्षांपासून ओळख होती. आरोपीने स्वतःला कार खरेदी-विक्रीचा व्यावसायिक असल्याचे सांगत, एका व्यक्तीला वैद्यकीय आणीबाणीमुळे त्याची मारुती अर्टिगा कमी किमतीत विकायची असल्याचे सांगितले. तसेच ही कार एखाद्या कंपनीत लावून चांगले उत्पन्न मिळवून देण्याचेही आश्वासन दिले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याच्या बँक खात्यात ऑनलाइन १ लाख ५० हजार रुपये वर्ग केले. विश्वास वाढावा म्हणून आरोपीने कारची कागदपत्रे, चावी आणि करारपत्र दाखवले. उर्वरित रक्कम आरटीओची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यास सांगितले.

काही दिवसांनी मूळ मालकाशी कंपनीची औपचारिकता पूर्ण करून कार लगेच परत आणतो, असे सांगून आरोपी कार घेऊन गेला. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला. कार परत मिळाली नाही आणि दिलेले पैसेही परत करण्यात आले नाहीत. आरोपीचा मोबाईलही बंद असल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हर्ष शास्त्रकार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.