नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील गडकरी वाड्याला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. E20 इंधन धोरणाच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र, गडकरी वाड्याकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांना महाल येथील गांधी गेट परिसरातच पोलिसांनी अडवले. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
E20 इंधन धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील गडकरी वाड्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गांधी गेट परिसरात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखत ताब्यात घेतले.
यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. E20 धोरणामुळे नागरिक आणि वाहनधारकांवर परिणाम होणार असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. याच पार्श्वभूमीवर गडकरी वाड्याला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.





