Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील चर्चित तरुणी ‘आशी डे’चा मृतदेह कान्हान नदीत; हत्येचा संशय!

ड्रग्ज कनेक्शन, जुने वाद, वैयक्तिक संबंध की अन्य कारण?
Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील चर्चेत असलेल्या तरुणी आशी डे हिचा मृतदेह सोमवारी पहाटे नागपूर ग्रामीणमधील कान्हान नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत संशयास्पद मृत्यूचे संकेत मिळाल्याने कान्हान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून विविध शक्यतांचा तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास कान्हान पोलिसांना नदीत एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला ओळख पटणे कठीण गेले, मात्र उपलब्ध छायाचित्रे आणि इतर माहितीच्या आधारे मृतदेह आशी डे हिचाच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांच्या मते, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणीची अन्य ठिकाणी हत्या करून मृतदेह कान्हान नदीत फेकण्यात आला असावा, अशी शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

जुन्या वादांचीही चौकशी-
तपासादरम्यान पोलिस आशी डे हिचे जुने वाद, वैयक्तिक संबंध, आर्थिक व्यवहार तसेच अलीकडील हालचालींची माहिती गोळा करत आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या भावाची हत्या झाली होती. त्या प्रकरणात न्यायासाठी ती सातत्याने प्रयत्नशील होती, अशी माहितीही समोर आली आहे.

Advertisement

ड्रग्ज कनेक्शनचाही तपास-
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा कथित अमली पदार्थांच्या जाळ्याशी किंवा इतर गुन्हेगारी संबंधांशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

अनेक प्रश्न अनुत्तरित-
या प्रकरणात सध्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. आशी डे कान्हान नदीपर्यंत कशी पोहोचली? तिची हत्या घटनास्थळी झाली की अन्यत्र? मृतदेह नदीत कोणी आणि केव्हा टाकला? हत्येमागे वैयक्तिक वैर, आर्थिक कारण की संघटित गुन्हेगारीचा संबंध आहे? या सर्व बाबींचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, कान्हान पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.