Published On : Tue, Aug 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बदनामी झाली तरी प्रसिद्धी मिळते, अशी त्यांची भूमिका;‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर फडणवीसांचा काँग्रेसला पलटवार

Advertisement

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेसच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, राजकारणाची पातळी इतकी खाली जाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. विरोधकांना जनतेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने केवळ चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“बदनाम झाले तरी चालेल, पण नाव तरी होईल, अशा पद्धतीने काहींचे राजकारण सुरू आहे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत अशा प्रकारची भाषा यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले की, काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेली टीका ही द्वेषातून करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या इतिहासाकडे पाहावे, कारण देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सक्षम नेतृत्व केले होते. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारही आपल्या कार्यातून नेतृत्व सिद्ध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

कृषिमंत्री दत्ता भरणे यांनीही काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध केला. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असून त्या एक यशस्वी उद्योजक आणि शेतकरी म्हणूनही ओळखल्या जातात. महिलांचा सन्मान राखणे ही महाराष्ट्राची परंपरा असून काँग्रेसने या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

या वादामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र झाले असून, ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याचा मुद्दा आगामी काळातही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.