Published On : Wed, Aug 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी; राखीसाठी २४ तास टपाल बुकिंग सुविधा

Advertisement

नागपूर : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी आणि भेटवस्तू देश-विदेशातील नातेवाईकांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात, यासाठी टपाल विभागाने विशेष नियोजन केले आहे. झिरो माईल्स येथील एनएसएच (NSH) केंद्रावर २४ तास बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात टपालाची वाढती संख्या लक्षात घेऊन स्पीड पोस्ट, देशांतर्गत पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राखीसोबत मिठाई, कपडे, भेटवस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित आणि वेळेत पाठविण्याची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे. पोस्ट कार्यालयांमध्ये पार्सल पॅकिंगची सुविधादेखील उपलब्ध आहे.

राखीसाठी झिरो माईल्स येथील एनएसएच केंद्रात स्वतंत्र बुकिंग काउंटर सुरू करण्यात आला असून, पार्सल वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेल्वे मेल सर्व्हिसेस, नागपूरचे अधीक्षक गणेश बी. आंभोरे यांनी नागरिकांना वस्तूंचे योग्य पॅकिंग करणे, पिनकोडसह संपूर्ण पत्ता नमूद करणे आणि वेळेआधी टपाल नोंदविण्याचे आवाहन केले आहे. पात्र सेवांसाठी ऑनलाइन ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या टपालाचा मागोवा घेता येणार आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी आणि शुभेच्छा सुरक्षित व वेळेत आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी टपाल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.