नागपुरात महामेट्रो भरतीच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा डाव; बनावट वेबसाईटद्वारे तरुणांची दिशाभूल!
नागपूर : महामेट्रोमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. सायबर भामट्यांनी महामेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळासारखी बनावट वेबसाईट तयार करून भरती प्रक्रिया सुरू असल्याचा भास निर्माण केला आणि उमेदवारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या...
नागपूरच्या धंतोलीतील मां भवानी मंदिरातील चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरांना अटक !
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरातील मां भवानी मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, चौकशीदरम्यान त्यांनी लकडगंज परिसरातील क्वेटा कॉलनी येथील शिवमंदिरात केलेल्या चोरीचीही कबुली...
महायुतीचा १७ पैकी १७ जागांवर विजय निश्चित; अपक्ष माघारीचा बावनकुळेंचा दावा
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम दावा केला. राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील सर्व अपक्ष उमेदवार आपले...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; आदिवासी कुटुंबाचे घर उद्ध्वस्त, संसार उघड्यावर
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली आणि बोंबिल टेक परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने आणि जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यामुळे एका आदिवासी कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर लचके यांच्या घरावरील...
नागपूरच्या धंतोलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिलांना आमिष दाखवून प्रवृत्त करणाऱ्या एजंटला अटक !
नागपूर : नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (SSB) धंतोली परिसरात सुरू असलेल्या कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत एका २२ वर्षीय एजंटला अटक केली आहे. महिलांना झटपट पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सामाजिक...
नागपूर जिल्ह्यात उर्सासाठी आलेल्या महिलेवर अत्याचाराचा आरोप; दरगाह संचालकासह तिघांना अटक!
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील एका प्रसिद्ध दरगाहमध्ये उर्सासाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी दरगाहच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध गंभीर...
रुपेरी पडद्यामागचा ‘किंगमेकर’ हरपला; ज्येष्ठ निर्माता पहलाज निहलानी यांचे ७६ व्या वर्षी निधन
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माता, वितरक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा...
विधान परिषद निवडणूक : संख्याबळ नसताना काँग्रेस कशासाठी मैदानात? राहुल गांधींवर बावनकुळेंचा निशाणा
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संख्याबळ कमी असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याऐवजी वास्तव स्वीकारावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या आर्थिक विषयांवरील वक्तव्यांवर...
नागपूर ग्रामीण पोलिसांचा झारखंडमध्ये धडाकेबाज छापा; २.२८५ किलो अफूसह आरोपींचे जाळे उघड!
उमरेड : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत झारखंड राज्यातील खूंटी जिल्ह्यातून २ किलो २८५ ग्रॅम अफू (अफिम) जप्त केली आहे. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह एकूण १३ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...
विदर्भातील चर्चित 200 कोटींच्या श्रीसूर्या महाघोटाळ्याचा निकाल लवकरच!
नागपूर : विदर्भातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि हजारो गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसलेला श्रीसूर्या गुंतवणूक महाघोटाळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल 13 वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात अभियोजन पक्षाने 75 साक्षीदारांची साक्ष पूर्ण केली असून आता केवळ दोन तपास...
भिवापूर आगीतील बाधितांना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचा तातडीचा मदतीचा हात — ₹२० लाखांची आर्थिक मदत २४ तासांत वितरित
नागपूर :नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे लागलेल्या भीषण आगीत गावातील अनेक घरे जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणात जनावरांचाही मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, त्यांच्या आयुष्यभराची कमाई काही क्षणांत राख झाली...
शेतक-यांच्या आत्मविश्वास वाढीसाठी अधिका-यांनी शेतक-यांच्या बांधावर जाणे आवश्यक- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे. शासन स्तरावर ज्या काही योजना आहेत त्या शेतक-यांना समजावून सांगितल्यास त्यांच्या मनात शेतीविषयी नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. प्रत्येक कृषी सहाय्यकाने महिन्यातून...
नागपूर खंडपीठासमोर प्रलंबित खटल्यांचा डोंगर; 73 हजारांहून अधिक प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर प्रलंबित खटल्यांची संख्या चिंताजनकरीत्या वाढली असून, न्यायव्यवस्थेवरील ताण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड (NJDG) च्या ताज्या आकडेवारीनुसार, नागपूर खंडपीठात सध्या तब्बल 73,137 प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी 7,972 खटले दहा...
बिहारमध्ये भीषण दुर्घटना; रुग्णालयाच्या ICU मध्ये आग, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू, 20 जण गंभीर
मुजफ्फरपूर : बिहारमधील मुजफ्फरपूर शहरात गुरुवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागून 10 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरा परिसरातील प्रसाद हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात...
लोकसहभागातून 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम राबविणार महापौर श्रीमती निता ठाकरे यांची माहिती
नागपूर: नागपूर महानगरपालिकातर्फे शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी शहरात लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याची महत्वाकांक्षी मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिली. या महाउपक्रमाचा शुभांरभ केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या...
Video-नागपुरातील घोगली-ऐंसारा मेट्रोपार्क मार्गाचे काम रखडले; हलक्या पावसातच रस्त्याची दुरवस्था उघड!
नागपूर : घोगली मेन रोड ते ऐंसारा मेट्रोपार्क परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, झालेल्या हलक्या पावसानेच रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेची पोलखोल केली असून ठिकठिकाणी चिखल, खड्डे आणि खराब झालेल्या मार्गामुळे...
ताडोबाची ‘झीनत’ बनली चार बछड्यांची आई; ओडिशातील व्याघ्र पुनर्वसन मोहिमेला मोठे यश
नागपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या ‘झीनत’ या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वन विभागांनी संयुक्तपणे राबविलेल्या आंतरराज्यीय व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून वन्यजीव...
नागपुरातील घोगली-ऐंसारा मेट्रोपार्क मार्गाचे काम रखडले; हलक्या पावसातच रस्त्याची दुरवस्था उघड!
नागपूर : घोगली मेन रोड ते ऐंसारा मेट्रोपार्क परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, झालेल्या हलक्या पावसानेच रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेची पोलखोल केली असून ठिकठिकाणी चिखल, खड्डे आणि खराब झालेल्या मार्गामुळे...
नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर बनवणार ३,००० किलो ‘तर्री पोहे’ बनविण्याचा विश्वविक्रम!
नागपूर- नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेल्या आणि देशभरात लोकप्रिय असलेल्या ‘तर्री पोह्यांना’ जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे ‘जागतिक पोहे दिना’चे औचित्य साधत रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी तब्बल ३,००० किलो तर्री पोहे...
दिल्लीच्या मालवीय नगरातील हॉटेलला भीषण आग; २१ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील ‘फ्लरिश स्टे’ हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मध्य आशिया आणि आफ्रिकेतील अनेक परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली...
गोंदिया: मंजिल थी ‘कान्हा नेशनल पार्क’ , लेकिन कार के लिए बस , काल बन गई
गोंदिया। एक तरफ छुट्टियां मनाने की खुशी, बच्चों के चेहरों पर कान्हा नेशनल पार्क देखने का उत्साह... लेकिन किसे पता था कि लोगुर घाटी के घुमावदार मोड़ों पर मौत घात लगाए बैठी है। एक तेज रफ्तार यात्री बस काल बनकर...

