Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महामेट्रो भरतीच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा डाव; बनावट वेबसाईटद्वारे तरुणांची दिशाभूल!

Advertisement

नागपूर : महामेट्रोमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. सायबर भामट्यांनी महामेट्रोच्या अधिकृत संकेतस्थळासारखी बनावट वेबसाईट तयार करून भरती प्रक्रिया सुरू असल्याचा भास निर्माण केला आणि उमेदवारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामेट्रो नागपूर येथे कार्यरत कनिष्ठ अभियंता प्रफुल गंगाधर कोहळे यांना सहकाऱ्यांकडून या फसवणुकीची माहिती मिळाली. चौकशीत “महामेट्रो वर्क” नावाची वेबसाईट महामेट्रोच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून फेसबुकवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांना अवघ्या 24 तासांत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या जाहिरातीवर विश्वास ठेवून एका युवकाने अर्ज शुल्क म्हणून 690 रुपये क्यूआर कोडद्वारे जमा केले. ही रक्कम अनुज गंगावार नावाच्या व्यक्तीच्या खात्यात पाठविण्यात आली.

यानंतर आरोपींनी ड्रेस कोड आणि इतर प्रक्रियेच्या नावाखाली आणखी 3 हजार रुपये भरण्याची मागणी केली. अतिरिक्त रकमेची मागणी होताच संबंधित युवकाला संशय आला आणि त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

Advertisement

पोलिस तपासात आरोपी बनावट वेबसाईट आणि खोट्या भरती जाहिरातींच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

बजाजनगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही भरतीसंदर्भातील जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहितीची पडताळणी करावी आणि कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा करू नयेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.