Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बिहारमध्ये भीषण दुर्घटना; रुग्णालयाच्या ICU मध्ये आग, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू, 20 जण गंभीर

Advertisement

मुजफ्फरपूर : बिहारमधील मुजफ्फरपूर शहरात गुरुवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागून 10 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरा परिसरातील प्रसाद हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 3 वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील ICU विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण मजल्यावर दाट धुराचे साम्राज्य पसरले. धुरामुळे अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अग्निशामक दलाची शर्थीची बचावमोहीम-
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी खिडक्या आणि दरवाजे तोडून ICU तसेच इतर वॉर्डमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 20 हून अधिक रुग्णांची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अग्निशामक विभागाचे अधिकारी आर. एन. पांडे यांनी सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यावर संपूर्ण ICU विभाग धुराने व्यापलेला होता. त्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Advertisement

नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप-
या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. आग लागल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना मदत करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून आग लागण्याचे नेमके कारण आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk | Video

Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...

nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges