Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या धंतोलीतील मां भवानी मंदिरातील चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरांना अटक !

क्वेटा कॉलनीतील शिवमंदिर चोरीचाही उलगडा
Advertisement

नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरातील मां भवानी मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, चौकशीदरम्यान त्यांनी लकडगंज परिसरातील क्वेटा कॉलनी येथील शिवमंदिरात केलेल्या चोरीचीही कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियममधील मां भवानी मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याच्या मण्यांची चोरी करण्यात आली होती. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धंतोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपींनी २६ मे रोजी मंदिराची रेकी केल्याचे निष्पन्न झाले.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हिंगणघाट येथील शेख सोहेल जावेद शेख आणि हुडकेश्वर येथील इरफान हमीद शेख यांचा समावेश आहे. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमालही आरोपींकडून जप्त केला आहे.

दरम्यान, चौकशीदरम्यान आरोपींनी ३ जूनच्या मध्यरात्री लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वेटा कॉलनी परिसरातील शिवमंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. या ठिकाणी दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती.

Advertisement

धंतोली पोलिसांच्या कारवाईमुळे मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, आरोपींनी यापूर्वी आणखी कुठे अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडविल्या आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges