नागपूर– नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेल्या आणि देशभरात लोकप्रिय असलेल्या ‘तर्री पोह्यांना’ जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे ‘जागतिक पोहे दिना’चे औचित्य साधत रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी तब्बल ३,००० किलो तर्री पोहे तयार करून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. वरील विश्वविक्रम विष्णूजी की रसोई, बजाज नगर, नागपूर येथे होणार आहे
नागपूरच्या खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या तर्री पोह्यांमध्ये पारंपरिक कांदा-पोह्यांवर मसालेदार हरभरा किंवा काळ्या वाटाण्यांच्या उसळीपासून तयार केलेली झणझणीत ‘तर्री’, नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनातील हा आवडता पदार्थ आज शहराची स्वतंत्र ओळख बनला आहे.
या भव्य विक्रमासाठी पहाटेपासूनच तर्री पोहे बनविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून सुमारे ३,००० किलो तर्री पोहे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत नागरिकांना या तर्री पोह्यांचे मोफत वितरण करण्यात येईल. उपस्थितांना कार्यक्रमस्थळी बसून आस्वाद घेता येईल.यावेळी महाचाय तर्फे चहाचे सुद्धा मोफत वितरण होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना शेफ विष्णू मनोहर म्हणाले की, “इंदोर जसे पोह्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच नागपूर आपल्या खास मसालेदार तर्री पोह्यांमुळे देशभर ओळखले जाते. लाखो नागपूरकरांच्या दिवसाची सुरुवात आजही तर्री पोह्यांच्या आस्वादाने होते. नागपूरच्या या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.”
शेफ विष्णू मनोहर यांच्या नावावर यापूर्वी अनेक जागतिक विक्रम नोंदले गेले आहेत. त्यामध्ये ८ फूट लांबीचा आणि ४० किलो वजनाचा शाकाहारी कबाब, सलग ५२ तासांची ‘कुकिंग मॅरेथॉन’, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेला भव्य हलवा, कुंभमेळ्यातील हजारो किलो हलवा निर्मिती, २५ तासांत १५,७७३ डोसे तयार करण्याचा विक्रम, ५ हजार किलो मिलेट खिचडी, ५,००१ अंड्यांची अंडा भुर्जी तसेच १,१११ किलो रागी (नाचणी) शिरा तयार करण्याचे विक्रम विशेष उल्लेखनीय आहेत.
आतापर्यंत ३० हून अधिक जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदविणारे शेफ विष्णू मनोहर आता नागपूरच्या तर्री पोह्यांना जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी आणखी एका ऐतिहासिक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागपूरच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा अभिमान वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





