Published On : Wed, Jun 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

Video-नागपुरातील घोगली-ऐंसारा मेट्रोपार्क मार्गाचे काम रखडले; हलक्या पावसातच रस्त्याची दुरवस्था उघड!

Advertisement


नागपूर : घोगली मेन रोड ते ऐंसारा मेट्रोपार्क परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, झालेल्या हलक्या पावसानेच रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेची पोलखोल केली असून ठिकठिकाणी चिखल, खड्डे आणि खराब झालेल्या मार्गामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘नागपूर टुडे’ने यावर प्रकाश टाकत नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

या समस्येकडे यापूर्वीही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने पावसाचे पाणी साचत आहे. परिणामी संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. सुमारे ९०० लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना रोज काम, शिक्षण आणि इतर कारणांसाठी या मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, रस्त्याची दयनीय अवस्था पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. तसेच, लवकरात लवकर ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.