Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भिवापूर आगीतील बाधितांना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचा तातडीचा मदतीचा हात — ₹२० लाखांची आर्थिक मदत २४ तासांत वितरित

Advertisement

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे लागलेल्या भीषण आगीत गावातील अनेक घरे जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणात जनावरांचाही मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, त्यांच्या आयुष्यभराची कमाई काही क्षणांत राख झाली आहे. त्यामुळे बाधित कुटुंबांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर समाजाप्रती आपली बांधिलकी जपत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तथा संस्थानाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने तसेच सर्व विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने बाधित कुटुंबांसाठी सुमारे ₹२० लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, ही मदत जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत तातडीने वितरित करण्यात आली असून, संस्थानच्या कार्यक्षमतेचे आणि संवेदनशीलतेचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या मदत कार्यावेळी संस्थानाचे उपाध्यक्ष श्री. अजय विजयवर्गी, सचिव श्री. दत्तुजी समरीतकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रविण लिखाणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्री. आनंदराव राऊत उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी (SDO) श्री. चव्हाण सर आणि प्रशासनाची टीमही मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्व मान्यवरांनी बाधित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला व या कठीण प्रसंगी संस्थान त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी राहिले असून, गरजू, आपत्तीग्रस्त व वंचित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. आरोग्य शिबिरे, आर्थिक सहाय्य आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे संस्थानने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भिवापूर येथील या आपत्तीमध्येही संस्थानने दाखवलेली तत्परता ही त्यांच्या समाजसेवेच्या वचनबद्धतेचे ज्वलंत उदाहरण आहे.

Advertisement

या कठीण प्रसंगी सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन बाधित कुटुंबांना धीर देणे आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करणे ही काळाची गरज आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान पुढेही अशाच प्रकारे समाजहितासाठी तत्परतेने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.