Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यात उर्सासाठी आलेल्या महिलेवर अत्याचाराचा आरोप; दरगाह संचालकासह तिघांना अटक!

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील एका प्रसिद्ध दरगाहमध्ये उर्सासाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी दरगाहच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालची रहिवासी असून ती उर्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आली होती. याच दरम्यान तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिला पश्चिम बंगालमध्ये परतली आणि तेथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ‘झिरो एफआयआर’ प्रक्रियेद्वारे हे प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी व दरगाह संचालक ताजी तनविरुद्दीन, त्याचा मुलगा ताजी मुस्तफीउद्दीन आणि तेजस खोबरागडे यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या संवेदनशील प्रकरणामुळे पारशिवनी आणि कन्हान परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून घटनेमागील सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे.

Advertisement

या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी पीडित महिलेने केली असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता पोलिस तपासाच्या निष्कर्षांकडे लागले आहे.

Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges