Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

रुपेरी पडद्यामागचा ‘किंगमेकर’ हरपला; ज्येष्ठ निर्माता पहलाज निहलानी यांचे ७६ व्या वर्षी निधन

Advertisement

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माता, वितरक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

निहलानी कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती देत, आज दुपारी ३ वाजता सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१९८० च्या दशकात निर्माता म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या पहलाज निहलानी यांनी अनेक यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. हथकडी, आंधी-तूफान, इल्जाम, आग ही आग, गुनाहों का फैसला, पाप की दुनिया, मिट्टी और सोना, शोला और शबनम यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता गोविंदाच्या कारकिर्दीला आकार देण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

चित्रपट निर्मितीबरोबरच त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळातील अनेक निर्णय चर्चेत राहिले आणि त्यांनी चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

Advertisement

पहलाज निहलानी यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी, धाडसी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आणि रुपेरी पडद्याला दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.