Published On : Wed, Jun 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीच्या मालवीय नगरातील हॉटेलला भीषण आग; २१ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

Advertisement

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील ‘फ्लरिश स्टे’ हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मध्य आशिया आणि आफ्रिकेतील अनेक परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८.५० वाजता हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत वरच्या मजल्यांवरील हॉटेलच्या खोल्या आणि तळघरापर्यंत (बेसमेंट) फैलाव केला. धूर आणि आगीच्या लोटांमुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये जीव वाचवण्यासाठी काही जण तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारताना दिसत आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी इमारतीखाली गाद्या टाकून बचावकार्य केले.

अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ४० जणांना सुरक्षित बाहेर काढले. तळघरातूनही सहापेक्षा अधिक लोकांची सुटका करण्यात आली. जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

Advertisement

साकेत येथील मॅक्स रुग्णालयाच्या माहितीनुसार, एकूण ३९ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. यातील ८ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या पाच जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर गंभीर भाजलेल्या एका रुग्णाला सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस, अग्निशमन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत दिल्लीत घडलेल्या विविध आग दुर्घटनांमध्ये ६६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे राजधानीतील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges