Published On : Fri, Mar 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातून खाटू श्याम दर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू

Advertisement

नागपूर : राजस्थानातील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात नागपूरच्या कामठी येथील पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात आई-वडील आणि मुलगा ठार झाले असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पारसे कुटुंबातील सदस्य राजस्थानमध्ये खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान सालासर रोडवर त्यांच्या टवेरा कारला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Gold Rate
Apr 22 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,700 /-
Silver/Kg ₹ 2,51,000/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अपघातात महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक मनोज चिंदमवारसह आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सालासर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच नागपूरच्या कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर ते कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement