Published On : Mon, Mar 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘या’ आठवड्यात बँका ५ दिवस बंद; ग्राहकांनी कामे आधीच पूर्ण करण्याचा सल्ला!

Advertisement

मुंबई : या आठवड्यात देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांमुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे १७ ते २२ मार्च २०२६ दरम्यान काही शहरांमध्ये बँका मिळून एकूण पाच दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे प्रलंबित असतील तर ती लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला ग्राहकांना देण्यात आला आहे.

कोणत्या दिवशी कुठे सुट्टी?

  • १७ मार्च (मंगळवार) : शब-ए-कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील.
  • १९ मार्च (गुरुवार) : गुढीपाडवाउगादी आणि तेलगू नववर्षामुळे महाराष्ट्रासह हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, पणजी आणि जम्मू-काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
  • २० मार्च (शुक्रवार) : ईद-उल-फित्र मुळे कोची, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे बँका बंद राहतील.
  • २१ मार्च (शनिवार) : ईदच्या निमित्ताने मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, जयपूर आणि भोपाळसारख्या प्रमुख शहरांतील बँक शाखा बंद असतील.
  • २२ मार्च (रविवार) : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील.

दरम्यान, बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM या सुविधा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील. मात्र चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार किंवा इतर शाखेशी संबंधित कामांसाठी ग्राहकांना बँक सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे बँक ग्राहकांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी आपली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement