शांतिनगरमध्ये ६६ वर्षीय फळ विक्रेत्यावर हल्ला; लाकडी दांड्याने मारहाण, पायाला फ्रॅक्चर
नागपूर -शांतिनगर परिसरात ६६ वर्षीय फळ विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वृद्धाच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा...
मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्री सीतारामन यांची घेतली भेट!
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजनांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयाकडूनही या...
नागपुरात गणेशपेठमध्ये धारदार शस्त्रांनी युवकाची हत्या; दोघे जखमी
नागपूर -गणेशपेठ हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत आजीला मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. मृताच्या भावाला...
भाजपच्या नव्या टीमची ७ महिन्यांनंतर घोषणा; भारती पवार, विनोद तावडेंसह दिग्गजांना संधी!
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी तब्बल सात महिन्यांनंतर पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नव्या टीममध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपाध्यक्षपदी, तर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बी. एल....
नागपुरातील अम्ब्रोशिया रिसॉर्टमध्ये सात वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
नागपूर : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी कुटुंबासोबत घालवण्यासाठी रिसॉर्टमध्ये गेलेल्या सात वर्षीय मुलाचा जलतरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाय परिसरातील अम्ब्रोशिया फार्म अँड रिसॉर्टमध्ये घडली. मृत मुलाचे नाव अभिनंदन कमलेश नागरवाडे (७)...
नागपुरात शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कोट्यवधींच्या बँक कर्ज घोटाळ्यात मुख्य आरोपीला न्यायालयाचा दणका
नागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मौदा शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी सचिन खुशाल कारेमोरे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून आरोपीची पोलीस...
नागपुरात पावभाजी संपल्याने संतप्त तरुणाचा विक्रेत्यावर कटरने हल्ला
नागपूर : लकडगंज परिसरात पावभाजी संपल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने विक्रेत्यावर कटरने हल्ला केल्याची घटना घडली. आरोपीने विक्रेत्याच्या मानेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विक्रेत्याने प्रसंगावधान राखत हल्ला चुकवला. यावेळी कटर गालावर लागल्याने विक्रेता गंभीर जखमी झाला. भालचंद्र यादव (४४)...
‘वंदे मातरम’चा अवमान खपवून घेतला जाणार नाही; महसूल मंत्री बावनकुळे यांची कारवाईची मागणी
नागपूर : ‘वंदे मातरम’चा अवमान करणे म्हणजे देशाच्या संस्कृती, राष्ट्रभावना आणि देशभक्तीचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रभावनेशी निगडित बाबींचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित...
नागपुरात दारूच्या बाटलीवरून वाद; पतीने पत्नीचे डोके जमिनीवर आपटल्याने मृत्यू
नागपूर : रनाळा परिसरात दारू आणि जेवणाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेच्या मृत्यूत झाले. पतीने पत्नीचे डोके जमिनीवर आपटल्याचा आरोप असून, या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खानवाणी लेआउट...
जलपर्णी मुक्त अंबाझरी तलावात नितीन गडकरी, महापौर यांनी घेतला नौका विहार चा आनंद
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून पूर्णतः मुक्त होण्याच्या मार्गावर असून, या निमित्ताने केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी जलपूजन करून अंबाझरी तलावात नौकाविहारचा आनंद घेतला. अग्निशमन विभागाच्या बोटीतून करण्यात आलेल्या...
मनपाद्वारे माजी सैनिकांच्या निवासस्थानी ‘नामफलक’
नागपूर, ता.१६ : देशरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि सीमांवर शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांच्या निवासस्थानासमोर सन्मानपूर्वक ‘नामफलक’ लावण्यात आले. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांच्या संकल्पनेतून आणि...
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा-पोलिसांचा स्मार्ट पुढाकार
नागपूर : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका व नागपूर शहर पोलिस यांच्या माध्यमातून लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदान(कच्छीविसा), येथे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्मार्ट पोलिस चौकी' चे लोकार्पण...
महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण
नागपूर, १५ ऑगस्ट २०२६: स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी नागपूर महानगरपालिका (NMC) मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यानंतर महापौरांनी मनपा अग्निशमन व आपत्कालीन सेवा दलाच्या संचलनाची पाहणी केली आणि जवानांची मानवंदना स्वीकारली. यावेळी बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी केंद्र...
मनपा मुख्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप
नागपूर : नागपूर महानगरपालिका मुख्यालयात 'हर घर तिरंगा' अंतर्गत कर्मचाऱ्यांना व उपस्थितांना आज (ता.१४) राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी 'भारत माता की जय',' वंदे मातरम' असे देशभक्तीपर घोषणा देत वातावरण निर्मिती करण्यात आली. यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे, सत्तापक्ष नेता...
नागपुरात गर्भपाताच्या प्रतिबंधित औषधांचा अवैध साठा; दोघांना अटक
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांसह इतर औषधांची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विनोबा भावेनगर येथील श्री साई दवाखान्यावर छापा टाकून सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचा औषधसाठा...
नागपुरात गोदाम फोडून दीड लाखांचा वायर लंपास; चार आरोपी अटकेत
नागपूर : कोतवाली पोलिसांनी गोदाम फोडून तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या वायरची चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वकीलपेठ परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा जप्त करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या...
नागपूरच्या मेयोमध्ये गोरगरिबांसाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उभारणार; बावनकुळेंचे आश्वासन
नागपूर : ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी उपचाराचे मोठे आधारस्थान ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेयो रुग्णालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाला आज प्रारंभ झाला. या वर्षात रुग्णांना अधिक अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून...
कर्तव्यनिष्ठेला सलाम…राष्ट्रपती पोलीस पदकांनी नागपूरच्या ‘या’ पाच पोलिसांचा होणार गौरव!
नागपूर : खाकी वर्दीतील प्रदीर्घ, निष्ठावान आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकांच्या यादीत नागपूरच्या पाच पोलिसांनी मानाचा तुरा रोवला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि नागपूर शहर पोलीस दलापर्यंत विविध स्तरांवर कार्यरत...
एका विद्यार्थिनीची हाक ठरली निर्णायक; नागपूर जिल्ह्यातील खेतापूरच्या मुलांसाठी अखेर बससेवेची सोय
नागपूर: शिक्षणासाठी रोज सात किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या खेतापूरच्या मुलींच्या अडचणीला अखेर वाट मिळाली. इयत्ता नववीत शिकणाऱ्या टीना वैकुंठे हिने सामाजिक माध्यमातून मांडलेल्या प्रश्नाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आणि अवघ्या काही काळातच खेतापूर ते नागपूर एसटी बससेवा सुरू करण्यात आली. कुही...
शांतिनगरमध्ये घरात घुसून महिलेची छेडछाड; शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप
नागपूर : शांतिनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिच्याशी अश्लील वर्तन करत शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तक्रार मिळताच शांतिनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला...
नागपुरात गणेशोत्सवाची सांस्कृतिक मेजवानी; गणेश मंडळांसह कला संस्थांना नोंदणीचे आवाहन
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने गणेश मंडळे आणि कला संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून नागपुरात ‘सांस्कृतिक गणेशोत्सव’ आयोजित केला जात आहे. कला,...

