Published On : Fri, Aug 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गणेशोत्सवाची सांस्कृतिक मेजवानी; गणेश मंडळांसह कला संस्थांना नोंदणीचे आवाहन

Advertisement

नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने गणेश मंडळे आणि कला संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून नागपुरात ‘सांस्कृतिक गणेशोत्सव’ आयोजित केला जात आहे. कला, साहित्य, संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्यासोबतच गणेश मंडळांना सांस्कृतिक उपक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यंदाच्या उत्सवात भक्तिसंगीत, सुगम संगीत, देशभक्तिपर गीते, हास्य कविसंमेलन, कीर्तन, गोंधळ, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रयोग, नाट्यप्रयोग, गीत रामायण, जादूचे प्रयोग, कथाकथन तसेच रांगोळी आणि मेंदी प्रशिक्षण वर्ग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे.

इच्छुक गणेश मंडळांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत, तर कला संस्थांनी आपल्या कार्यक्रमांची नोंदणी ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत करावी, असे समितीने कळविले आहे.नोंदणी व अधिक माहितीसाठी २० ऑगस्टपासून दररोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाल येथील नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधता येणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.