Published On : Mon, Aug 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पावभाजी संपल्याने संतप्त तरुणाचा विक्रेत्यावर कटरने हल्ला

Advertisement

नागपुरात पावभाजी संपल्याने संतप्त तरुणाचा विक्रेत्यावर कटरने हल्ला

नागपूर : लकडगंज परिसरात पावभाजी संपल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने विक्रेत्यावर कटरने हल्ला केल्याची घटना घडली. आरोपीने विक्रेत्याच्या मानेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विक्रेत्याने प्रसंगावधान राखत हल्ला चुकवला. यावेळी कटर गालावर लागल्याने विक्रेता गंभीर जखमी झाला.

भालचंद्र यादव (४४) हे पावभाजी विक्रीचा व्यवसाय करतात. घटनेच्या रात्री काम आटोपून यादव घरी परतले होते. गाडीला कुलूप लावत असताना परिसरात राहणारा आरोपी त्यांच्याकडे आला आणि त्याने पावभाजी मागितली. मात्र, पावभाजी संपल्याचे यादव यांनी सांगितल्याने आरोपी संतप्त झाला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपीने यादव यांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर त्याने कटर काढून यादव यांच्या मानेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादव यांनी हल्ला चुकवला, मात्र कटर त्यांच्या गालावर लागल्याने ते जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी यादव यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.