ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर भारताचा निर्णायक पवित्रा; ‘एफ-३५’ जेट खरेदीचा करार थांबवला
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला मोठा झटका देत ‘एफ-३५’ स्टेल्थ लढाऊ विमान खरेदीचा प्रस्ताव थांबवला आहे. संरक्षण क्षेत्रातील...
गुलाब फुलशेतीला उभारी;कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची विंचूर येथे भेट; शेतकऱ्यांशी साधला संवाद
सावनेर: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे बुधवार, 30 जुलै 2025 रोजी कृषी आयुक्त श्री. सुरज मांढरे यांनी विंचूर (ता. सावनेर) येथे भेट देत श्री. इकबाल गफार बराडे (रा. वेलतूर) यांच्या गुलाब फुलशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MGNREGS)...
स्वबळ आणि संस्कृतीच भारताच्या प्रगतीचे सूत्र; मोहन भागवतांचे ‘टॅरिफ’ धोरणावर सूचक विधान
नागपूर : अमेरिकेच्या 'ट्रम्प टॅरिफ' धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, भारताने स्वबळावर आधारित विकासाचा मार्ग स्वीकारायला हवा, असा स्पष्ट संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला आहे. नागपुरात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या डॉ. हेडगेवार आंतरराष्ट्रीय...
नागपुरातील हिंगणा येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;एकाला अटक,चार महिलांची सुटका
नागपूर : ऑपरेशन शक्ती अंतर्गत कारवाई करत नागपूर गुन्हे शाखा युनिट-1 ने हिंगणा हद्दीतील महालक्ष्मीकृपा गेस्ट हाऊसमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी 55 वर्षीय नरेंद्र प्रभाकर निनावे या आरोपीला अटक केली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई...
मंत्री मानिकराव कोकाटे यांचे डिमोशन;कृषी विभाग काढून खेळ खात्याची देण्यात आली जबाबदारी!
मुंबई : सतत वादांमध्ये अडकलेल्या मंत्री मानिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या हातून कृषी मंत्रालय काढून घेण्यात आलं असून, त्यांच्याकडे आता खेळ आणि युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. दुसरीकडे, आतापर्यंत खेळ खाते सांभाळणारे...
शालार्थ आयडी घोटाळ्यात कारवाई; तीन सहाय्यक शिक्षकांना अटक
नागपूर :शासकीय पगारासाठी बनावट शालार्थ आयडीचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन सहाय्यक शिक्षकांना अटक केली आहे. या आरोपींनी तब्बल २५ लाख रुपयांहून अधिक आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक...
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या पृथक्करण व वैधानिक दर्जा साठी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी (ता.३१) त्यांच्या मुंबई येथील 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत ऍड. मेश्राम यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विशेष आभार...
कोल्हापुरातही हायकोर्टाच्या खंडपीठाचे कामकाज सुरु होणार; १८ ऑगस्टपासून होणार अमलबजावणी!
मुंबई : राज्याच्या न्यायिक क्षेत्रात ऐतिहासिक घडामोड घडली असून, आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथेही बसणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ पासून या निर्णयाची अमलबजावणी होणार असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई किंवा औरंगाबादपर्यंत प्रवास करावा लागणार नाही. राज्य पुनर्रचना...
नागपुरातील गंगा-जमुना परिसरात वेश्याव्यवसायासाठी वापरली जाणारी खोली एका वर्षासाठी सील!
नागपूर: नागपूरच्या गंगा-जमुना वेश्या व्यवसाय क्षेत्रात सुरू असलेल्या पोलिस कारवायांदरम्यान, लकडगंज पोलिसांनी एका वेश्याव्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या खोलीवर न्यायालयाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी टाळे ठोकले आहे. ही कारवाई ३० जुलै २०२५ रोजी करण्यात आली असून, संबंधित खोली सर्कल नंबर ११/१६, वॉर्ड नंबर ३७,...
कन्हान WTP व K-900 मिमी फीडर मुख्य जलवाहिनीचे नियोजित शटडाऊन…
नागपूर,: नागपूर महानगरपालिका (NMC) आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र (WTP) व मुख्य फीडर जलवाहिन्यांवर अत्यावश्यक देखभाल व दुरुस्ती कामांसाठी शटडाऊनचे नियोजन केले आहे. शटडाऊनचे तपशील: कन्हान WTP येथे दि. 2 ऑगस्ट 2025 (शनिवार) रोजी सकाळी 10:00 ते दुपारी...
वन ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याची उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचलला असून अर्थव्यवस्था ' वन ट्रिलियन डॉलर' करण्यासाठी राज्याची वेगवान वाटचाल सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशियाई पायाभूत सोयी सुविधा गुंतवणूक बँकेने...
नागपूरात रेशीमबाग चौकात तडीपार गुन्हेगाराची दहशत; पानठेला, ऑटोसह कारची केली तोडफोड
नागपूर : शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेशीमबाग चौक परिसरात मंगळवार रात्री उशिरा एक तडीपार गुन्हेगार पीयूष बेले आणि त्याच्या साथीदारांनी प्रचंड दहशत निर्माण केली. जुन्या वैमनस्यातून या टोळीने एका पानठेल्यावर जोरदार हल्ला करत त्याची तोडफोड केली. तसेच परिसरातील ऑटो आणि...
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार उघड; अपात्र महिलांवर कारवाईचा इशारा,मंत्री आदिती तटकरे यांची भूमिका
पुणे : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्याचा असताना, काही अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. विशेषतः सरकारी नोकरीत कार्यरत महिलांनी देखील अर्ज करून लाभ मिळवल्याचे उघड झाले आहे. यावर महिला व...
राष्ट्रसेवेचा दीप निमाला…! आमदार संदीप जोशी यांची प्रमिलताईंना श्रद्धांजली
राष्ट्रसेवा आणि समर्पणाची भावना आयुष्यभर जपणाऱ्या राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आणि वेदना देणारे आहे. त्यांचा जो काही सहवास मला लाभला त्या सहवासामुळे कृतार्थ झालो. त्यांच्या जगण्यातून मला राष्ट्रभक्तीची, समर्पणाची आणि...
नागपुरात मनसे कार्यकर्ते आक्रमक; एनआयटी अभियंता सुरेश चव्हाण यांना काळं फासलं, व्हिडिओ व्हायरल
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) च्या पूर्व नागपूर विभागीय कार्यालयात गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ करत स्थापत्य अभियंता सहाय्यक सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फासली. मनसेने त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावत हा तीव्र निषेध नोंदवला. मनसेच्या...
हिंदूंना दहशतवादी ठरवणाऱ्यांनी माफी मागावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “भगवा दहशतवाद” असा बनावट प्रचार करून काँग्रेसने हिंदू समाजाला बदनाम...
नागपुरातील बाबा सावजी रेस्टॉरंटवरही कारवाई; सातत्याने नियमभंग केल्याने ५ दिवसांसाठी बंदीचे आदेश !
नागपूर :दारू सेवनासंदर्भातील नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी, प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेलं बाबा सावजी रेस्टॉरंट (हिंगणा टी-पॉईंट) येत्या ३१ जुलै २०२५ पासून ५ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्री. एस. ऋषिकेश रेड्डी यांनी दिले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र...
नागपुरात ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचे जल्लोषात स्वागत
नागपूर :फिडे महिला विश्वचषक जिंकून परतलेल्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचे नागपूर विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. बुद्धिबळाच्या या आंतरराष्ट्रीय विजेतेपदामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेषतः नागपूरचा अभिमान वाढवणाऱ्या दिव्याच्या आगमनाने शहरात उत्साहाचे वातावरण होते. स्वागताच्या वेळी महाराष्ट्र...
आतंकवाद कधीच भगवा होऊ शकत नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर प्रतिक्रिया
मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने निकाल देत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नागपूर पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची कारवाई; चार पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून केले बडतर्फ, एक निलंबित
नागपूर : नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आणि पोलिस दलात शिस्तबद्धता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मोठी कारवाई केली आहे. बुधवारी तिन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार पोलिस कॉन्स्टेबल्सना बडतर्फ करण्यात आले असून, एका कर्मचाऱ्याला निलंबित...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल १७ वर्षांनंतर निकाल; प्रज्ञासिंह ठाकूरसह सर्व आरोपी निर्दोष मुक्त !
मुंबई : देशातील एक अत्यंत संवेदनशील आणि गाजलेलं प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर जाहीर झाला. तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं. यामध्ये भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह...