नागपुरमध्ये एकता कपूर उभारणार भव्य स्टुडिओ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
नागपूर : प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट निर्माती, अभिनेता जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर लवकरच नागपुरात एक भव्य स्टुडिओ स्थापन करणार आहेत. यामुळे विदर्भातील मनोरंजन आणि सेवा क्षेत्राला मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी एका कार्यक्रमात...
नागपूरात व्यापार्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणारी टोळी सक्रिय; लाखोंच्या खंडणीप्रकरणी खळबळ
नागपूर : शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना मोहजालात अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारी एक 'हनी ट्रॅप' टोळी सध्या नागपूरमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीत सुमारे सात जणांचा समावेश असून, त्यामध्ये पुरुष आणि महिलांचा सहभाग आहे. या टोळीतील...
हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार स्थापन, आमच्याकडे ठोस पुरावे; काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
नागपूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, "हनीट्रॅपच्या प्रकरणामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सत्तांतर झाले." वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे राज्याच्या...
नागपूर सेंट्रल जेलमध्ये पुन्हा खूनी झटापट; कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा केला हल्ला
नागपूर – नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमधील हिंसक वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीत. बुधवारी पुन्हा एकदा जेलमध्ये झालेल्या क्रूर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर दातांनी चावा घेत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...
नागपूरला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न, गुन्हेगारीची संख्या राज्याच्या तुलनेत कमी;फडणवीसांचा विधानसभेत दावा
नागपूर — उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीची संख्या राज्याच्या तुलनेत कमी असून विरोधक केवळ नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये मोठ्या...
नागपूरमध्ये गांजाच्या मोठ्या साठ्यावर छापा; दोन आरोपींना अटक, ४१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
नागपूर– नागपूर शहरातील पारडी पोलिसांनी मोठी कारवाई करत १०६.८५० किलो अमली पदार्थ गांजासह एकूण ४१ लाख ५८ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१७ जुलै) पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-हैदराबाद हायवेवरील महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागे...
नागपूरसह राज्यभरात सुमारे २०,००० परिचारिका बेमुदत संपावर; आरोग्यसेवा विस्कळीत
नागपूर —महाराष्ट्र सरकारच्या ठेका पद्धतीने परिचारिका भरती करण्याच्या धोरणाचा निषेध करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातव्या वेतन आयोगातील विसंगती आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील निर्णयांविरोधात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि इंदिरा गांधी...
पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्यक्त केली शक्यता
नवी दिल्ली : देशातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळू शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीत झालेल्या एनर्जी डायलॉग 2025 या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, "जर...
विधानभवनात खून झाले तरी आश्चर्य वाटू नये;राज ठाकरे यांचा संताप
मुंबई – राज्याच्या विधीमंडळाच्या प्रांगणात काल झालेल्या गोंधळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवत सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवरही खरमरीत शब्दांत टीका केली आहे. “विधानभवनात जर भविष्यात आमदारांचे खूनही झाले, तरी कोणीही चकित होणार नाही,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला...
सर्पदिनानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्यात नागपूरच्या चैताली भस्मे यांचा गौरव!
नागपूर - जागतिक सर्पदिन १६ जुलै २०२५ च्या निमित्ताने इंडियन नॅचरल हनिबीज, पुणे तसेच स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प), वाळूज आणि कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन...
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात; तयारीला सुरुवात
नागपूर – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून नागपुरात पार पडणार असून, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उपराजधानीत हे अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या...
नागपुरातील लकडगंज परिसरातील वाईन शॉपवर शस्त्रधारी हल्ला
नागपूर – लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘क्वालिटी वाईन शॉप’ वर बुधवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी शस्त्रधारी हल्ला करत परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांपैकी दोन आरोपींना अटक केली असून, तिसरा आरोपी सध्या...
मोफत योजनांसाठी भरपूर पैसा, पण कायदा-सुव्यवस्थेसाठी नाही? उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
नागपूर – राज्य शासन मोफत वाटपासाठी लाखो खर्च करतं, पण पोलीस भरतीसाठी मात्र निधी नाही?अशा कठोर शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. पोलीस दलातील रिक्त पदांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असताना सरकारकडून निधीअभावी भरती रखडल्याचे...
नागपूरात अवघ्या दोन तासांच्या पावसाने शहर झाले जलमय; रेल्वे स्थानकासह अनेक परिसरात साचले पाणी
नागपूर – उपराजधानी नागपूरात गुरुवारी अवघ्या दोन तासांच्या जोरदार पावसाने महापालिकेच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस दुपारी १ वाजेपर्यंत कायम राहिला. या कालावधीत संपूर्ण शहराच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले दिसून आले. रेल्वे स्थानक...
नागपूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ; एका महिन्यात १३४ प्रकरणं, ३४ विषारी हल्ले!
नागपूरच्या विधानभवन परिसराला नवे रूप; आधुनिक प्रशासकीय इमारतींचा आराखडा सादर
मुंबई - नागपूरमधील ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. येथील प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील गरजांना तोंड देण्यासाठी या परिसराचा विस्तारीत विकास करण्यात येणार आहे. बुधवारी मुंबई येथील विधानभवनात हा महत्त्वाकांक्षी आराखडा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली...
नागपुरात चेन स्नॅचिंग टोळीचा भंडाफोड; ५ प्रकरणांचा खुलासा, मुख्य आरोपीला अटक
नागपूर – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला चेन स्नॅचिंग प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. चेन स्नॅचिंग विरोधी पथकाने जबरदस्तीने चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीलेले सोनं, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. तसेच चोरीचे सोनं खरेदी करणाऱ्या एका सराफालाही...
नागपूर जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ; एका महिन्यात १३४ प्रकरणं, ३४ विषारी हल्ले!
नागपूर : जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सर्पदंशाच्या तब्बल १३४ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. यापैकी ३४ प्रकरणांमध्ये करैत, कोब्रा आणि रसेल वायपरसारख्या अत्यंत विषारी जातींच्या सापांनी हल्ला केला. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व पीडितांचा जीव वाचला आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि...
फुटाळा म्युझिकल फाउंटनमधील ११ कोटींचा अपव्यय;जबाबदार कोण? पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचा संतप्त सवाल
नागपूर -नागपूरच्या हृदयात वसलेला फुटाळा तलाव, एकेकाळचा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. याच परिसरात भव्यदिव्य “म्युझिकल फाउंटन प्रकल्प” साकारण्याचं स्वप्न उराशी बाळगून कोटींहून अधिक खर्च करून उभारलेला हा प्रकल्प आज अक्षरशः धूळ खात पडून आहे. नुकतेच आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत हा...
नागपुरातील वाठोडा परिसरात सुरक्षा रक्षकाची हत्या; तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर – शहरातील वाठोडा भागात पुन्हा एक धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. लूटपाटीच्या उद्देशाने एका सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे. या घटनेने...
वाठोड़ा परिसरात पुन्हा खळबळजनक हत्या!
नागपूर: वाठोड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एक धक्कादायक आणि खळबळजनक हत्या उघडकीस आली आहे. वाठोड़ा रोडवरील पेट्रोल पंपासमोरील एका बांधकाम साईटवर लूटपाटीच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.