नागपूर : जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सर्पदंशाच्या तब्बल १३४ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. यापैकी ३४ प्रकरणांमध्ये करैत, कोब्रा आणि रसेल वायपरसारख्या अत्यंत विषारी जातींच्या सापांनी हल्ला केला. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व पीडितांचा जीव वाचला आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि विदर्भ सर्पमित्र समितीच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ही शक्य झाली. बहुतांश सर्पदंशाच्या घटना रात्री झोपलेले असताना किंवा शेतात काम करताना घडल्या आहेत.
सर्पमित्र समितीचे अध्यक्ष मोनू सिंह यांनी सांगितले की, “मानसून सुरू झाल्यावर साप आपल्या बिळातून बाहेर येतात आणि मानवी वस्तीत शिरतात, त्यामुळे धोका वाढतो.”
“गोल्डन ऑवर”मुळे वाचले १३४ जीव –
जिल्हा आरोग्य विभागानुसार, सर्व रुग्णांना त्वरित उपचार देण्यात आले.
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये अँटी-वेनम औषध आणि आपत्कालीन सुविधा पूर्वीपासून सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
सर्पदंशानंतरचा पहिला एक तास ‘गोल्डन ऑवर’ मानला जातो. यामध्ये उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते.
बचावाचे उपाय – सर्पमित्र समिती आणि आरोग्य विभागाचे आवाहन-
झोपण्यापूर्वी गादी, उशी आणि सभोवताली नीट पाहणी करा
शक्यतो जमिनीवर झोपू नये, मच्छरदाणीचा वापर करा
शेतात काम करताना लांब बूट आणि हातमोजे वापरा
गवती किंवा झाडीदार भागात सावधगिरीने चाला
घराजवळ कचरा, लाकूड किंवा कबाड जमा होऊ देऊ नका
रात्री बाहेर पडताना टॉर्च नक्की सोबत घ्या
सर्पदंश झाल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा सर्पमित्रांशी संपर्क करा
भय नव्हे, सावधगिरी हवी- मोनू सिंह यांचा संदेश
‘विंग्स ऑफ नेचर’ या संस्थेअंतर्गत सर्पमित्र गावोगाव जनजागृती करत आहेत.
मोनू सिंह म्हणाले, “सापांपासून घाबरण्यापेक्षा त्यांची माहिती, सावधगिरी आणि वेळेवर उपचार हे अधिक महत्त्वाचे आहेत.जिल्हा प्रशासनाने प्रत्येक रुग्णालयात अँटी-वेनमचा साठा उपलब्ध केला आहे.
नागपूरमधील प्रमुख सर्पमित्रांची संपर्क यादी-
(साप दिसल्यास किंवा सर्पदंश झाल्यास तात्काळ संपर्क साधा)
नाव | क्षेत्र | मोबाईल क्रमांक |
---|---|---|
मोनू सिंह | हिंगणा ग्रामीण | 9422120248 |
गौरंग वाईकर | वर्धा रोड, खामला | 9970099910 |
प्रवीण कटरे | सोनेगाव, माटे चौक | 9766777656 |
अमित वंजारी | हिंगणा एमआयडीसी | 9665175882 |
राज चव्हाण | बेलतरोडी, हुडकेश्वर | 8484850781 |
साहिल शरणागत | महाल, तुकडोजी पुतळा | 9579052999 |
गजु पटले | मनीष नगर, छत्रपती | 9021309890 |
संतोष सोनी | मेडिकल, ओमकार नगर | 9420082603 |
राहुल मानके | बजाज नगर, सिविल लाईन्स | 9730760537 |
कुणाल तिरपुडे | त्रिमूर्ती नगर, जयताळा | 9922889099 |
राकेश भोयर | गणेशपेठ, गांधीबाग | 9834224939 |
आशीष मेंढे | नरसाळा, दिघोरी | 8793783984 |
रूपचंद वैद्य | वाठोडा, कलमणा | 9049794981 |
आशीष मेश्राम | डिफेन्स, वडधामना | 9096962385 |
सुशिल मेश्राम | बुटीबोरी एमआयडीसी | 7066584194 |
सौरभ अब्लंकर | अंबाझरी, फुटाळा | 7378381492 |
गितेश मदनकर | टी-पॉईंट, जयताळा | 9049709444 |
आकाश मेश्राम | वाणाडोंगरी, हिंगणा | 8625803647 |
दरम्यान पावसाळ्यात सर्पदंशाची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, सावध राहावे आणि आवश्यक ती मदत घेण्यासाठी आमच्याशी २४x७ संपर्क साधावा, मोनू सिंह म्हणाले.