महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार नियुक्ती; राज्य कार्यकारिणीची पक्षाची यादी अखेर जाहीर
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली असून, विशाल मुत्तेमवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या नव्या कार्यकारिणीत एकूण 36 जणांचा राजकीय व्यवहार समितीत, तर...
महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव; राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा घणाघात
गोंदिया : राज्यातील महायुती सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना देशमुखांनी सरकारमधील समन्वयाचा अभाव, भ्रष्टाचार आणि ‘लाडली बहिण’ योजनेतील अनियमितता यावर सडकून टीका केली. तीन...
नागपुरात सदर परिसरात भरदुपारी २५.५ लाखांची चोरी
नागपूर (सदर) : शहरातील अत्यंत वर्दळीच्या सदर भागात भरदुपारी घडलेल्या मोठ्या चोरीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. श्रीराम टॉवरसमोर रस्त्यालगत उभी असलेल्या फॉर्च्युनर गाडीची काच फोडून चोरट्यांनी तब्बल २५ लाख ५० हजार रुपये रोख आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली....
नागपुरातील पिरॅमिड सिटी ३ मध्ये अनधिकृत फेरबदलांचा कहर; रहिवाशांच्या सुरक्षेवर घाला
नागपूर: बेसा-पिपळा रोडवरील पिरॅमिड सिटी ३ या गृहनिर्माण संकुलात अनेक फ्लॅटधारकांकडून त्यांच्या फ्लॅटमध्ये अंतर्गत फेरबदल (इंटर्नल अल्टरेशन) केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारांमध्ये बांधकाम परवानग्या किंवा गृहनिर्माण सोसायटीच्या संमतीशिवाय आरसीसी फ्रेमच्या रचनेत बदल करणं आढळून येत आहे. विशेष म्हणजे, अशा...
बारमध्ये बसून शासकीय फाईल्सवर सही करणाऱ्या PWD अधिकाऱ्यावर कारवाई
नागपूर : नागपूरमधील एका बारमध्ये मद्यप्राशन करत शासकीय फाईल्सवर सही करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्याविरुद्ध अखेर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कार्यरत उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना समोर आली तेव्हा सोशल...
नागपूर सेंट्रल जेलचे खापरखेडा येथील चिंचोली गावाच्या परिसरात स्थलांतर; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रस्तावाला मंजुरी
नागपूर : महाराष्ट्र सरकारने नागपूर आणि ठाणे येथील ऐतिहासिक तुरुंगांना शहराबाहेर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब करत दोन्ही शहरांच्या कारागृह व्यवस्थेत मोठा बदल घडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर सेंट्रल जेलला...
राज्य सरकारच्या चार लोकप्रिय योजनांना तात्पुरता ब्रेक;दोन महत्त्वाचे जीआर रद्द, नेमके कारण काय?
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजलेल्या काही महत्त्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारकडून तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन, मुख्यमंत्री वयोश्री योजना, एक रुपयात पिकविमा आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या चार योजनांचा समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही सध्या...
लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा गोंधळ? घोटाळ्यावर सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत तब्बल ४८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पुरुष लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ...
नागपुरात ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेअंतर्गत १८ दिवसांत 50 टक्क्यांहून अधिक कारवाई!
नागपूर : नागपूर शहर वाहतूक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेअंतर्गत अवघ्या १८ दिवसांत तब्बल ६३६ कारवाईची नोंद झाली असून, ही संख्या जानेवारी २०२५ पासून २८ जुलैपर्यंत झालेल्या एकूण १३२४ कारवायांपैकी अर्ध्याहून अधिक आहे. ही मोहिम १० जुलै ते २८ जुलै...
आता संयमाचा अंत झालाय;मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई :राज्यातील काही सत्ताधारी मंत्र्यांकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची प्रतिमा धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत थेट नाराजी व्यक्त करत सर्व मंत्र्यांना कडक इशारा दिला आहे. फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता वादग्रस्त...
नागपूर पोलिसांकडून 220 अनधिकृत दुचाकींचा स्क्रॅप लिलाव; नागरीकांसाठी खरेदीची संधी
नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने विनादाव्याचे (Unclaimed) वाहनांचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वाहतूक परिमंडळ सोनेगाव व इंदोरा येथे अनेक वर्षांपासून पडून असलेल्या एकूण 220 दुचाकी वाहनांचा स्क्रॅप लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये सोनेगाव विभागातील 48...
नागपुरात एका घरावर छापा टाकून १.९४ किलो गांजा जप्त; ५५ वर्षीय आरोपीला अटक
नागपूर : कळमना पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत एका ५५ वर्षीय इसमाच्या घरावर छापा टाकून सुमारे १.९४ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई २८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत ओम नगर परिसरातील प्लॉट...
‘ब्रँड’ महत्त्वाचा की ‘ब्रेक’? नागपूरच्या रस्त्यावर वाहतूक सुरक्षेला झगमगता धोका!
नागपूर – रात्रीच्या वेळेस जेव्हा एखाद्या शहराचे चौक दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतात, तेव्हा ते दृश्य नक्कीच मोहक वाटते. पण या झगमगाटामागे जर वाहतूक सुरक्षेचा बळी जात असेल, तर ते मोहक दृश्य गंभीर प्रश्नांची मागणी करू लागते. नागपूरच्या मुख्य चौकांमध्ये उभारण्यात...
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तयार होणार २० नवे केज; वाघांच्या वाढत्या संख्येमुळे वन विभागाचा निर्णय
नागपूर : गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये वाघांची सतत वाढती संख्या आता वन विभागासाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने सेंटरमध्ये २० नवे पिंजरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून जखमी, आक्रमक किंवा मानवी वस्तीच्या आसपास सापडणाऱ्या वाघांना...
नागपुरात वाहतूक पोलिसांची कारवाई; ७० ऑटोसह ई-रिक्शा जप्त नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
नागपूर : शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलत २४ ऑटो रिक्षा आणि ४६ ई-रिक्षा जप्त केल्या आहेत. ही कारवाई नागपूर शहराच्या विविध भागांमध्ये करण्यात आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ऑटो रिक्षा जप्त करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे निर्धारित क्षमतेपेक्षा...
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर; दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल ऑनलाईन उपलब्ध
नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) पुरवणी परीक्षांचे निकाल अधिकृतरीत्या जाहीर केले आहेत. हे निकाल mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, कोकण आणि छत्रपती...
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला; वाठोडा परिसरातील प्रकार, दोघांना अटक
नागपूर : प्रेमसंबंधाला विरोध केल्याने नागपुरात मेव्हण्यावर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी दहन घाटाजवळ ही घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणात दोघा आरोपींना अटक केली आहे. गंभीर जखमी अवस्थेत मेव्हणा खासगी रुग्णालयात...
नागपुरात संततधार पावसाचा जोर; पुढील ४८ तासांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट
नागपूर : मंगळवारी सकाळपासून उपराजधानी नागपूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी दिवसभर हलक्या सरी पडत होत्या, मात्र मंगळवारी पहाटेपासून पावसाने...
फडणवीसांच्या विजयाला सुप्रीम कोर्टात आव्हान; काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांची याचिका
नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस...
नागपूर शहराला मिळाले ३५वे पोलिस ठाणे; खापरखेडा ठाण्याचा शहर हद्दीत समावेश
नागपूर : नागपूर शहराच्या उत्तर दिशेने झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक व निवासी विकासाला अनुसरून खापरखेडा पोलिस ठाण्याचा समावेश आता औपचारिकरीत्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे. यामुळे नागपूर शहरातील एकूण पोलिस ठाण्यांची संख्या आता ३५ झाली आहे. राज्य गृह...
गुणवंतांचा सत्कार आणि ‘बुक बँके’चे लोकार्पण
नागपूर : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सिद्धीविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग 16 ड यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बुक बँक लोकार्पण सोहळा सायंटिफिक सभागृहात उत्साहात...